Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा

सुषमा पाटील विद्यालयात ‘शाळा अंतर्गत’ फेरी उत्साहात, २५ विद्यार्थी आंतरशालेय फेरीसाठी पात्र

पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेच्या शाळा अंतर्गत फेरीचा उत्साह कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात उसळला होता. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या २१५ विद्यार्थ्यांनी या फेरीत सहभाग घेतला.

          विद्यार्थ्यांनी माझं स्वप्न, शिक्षणाचं महत्त्व, इंटरनेट – वरदान की शाप?, प्लास्टिक मुक्त भारत, जर मी जादूगार असतो अशा विविध विषयांवर उत्कटतेने भाषण केले. उत्तम विषय मांडणी, देहबोली, स्पष्ट उच्चार आणि आत्मविश्वास याच्या आधारावर परीक्षकांनी गुणांकन केले. स्पर्धेच्या निकषांमध्ये विषयाची मांडणी व सुसंगता, देहबोली, स्वच्छ आणि स्पष्ट आवाज, वक्तशीरपणा, भाव आणि आवाजातील चढ-उतार अशी होती. स्पर्धेतील कठोर पण प्रेरणादायी वातावरणातून शेवटी २५ विद्यार्थी आंतरशालेय फेरीसाठी पात्र ठरले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढली असून पुढील फेरीसाठी तयारी सुरू झाली आहे. हा उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाउंडेशनच्या पुढाकारातून यशस्वीपणे राबवला जात आहे. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक, पालक आणि शाळा प्रशासनाचा मोलाचा वाटा आहे.

काशिश फाउंडेशनचे आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा हा एक खूपच छान कार्यक्रम आहे. मी पहिल्या फेरीत प्रथम क्रमांक मिळवला. आता दुसऱ्या फेरीत वर्गांमधील स्पर्धा होणार आहे. हे देखील चांगले आहे कारण विद्यार्थी त्यांचा आत्मविश्वास कसा दाखवतात आणि बोलतात ते पाहता येते.मला आशा आहे की मी तिसऱ्या फेरीत निवडला जाईन. ते आम्हाला कसे बोलायचे आणि इतर अनेक गोष्टी शिकवतात. पहिल्या फेरीत त्यांनी आम्हाला पदकं, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू दिल्या. ही भेटवस्तू खूपच छान व उपयोगी होती. मी तो बॅग सुद्धा वापरते.

– विद्यार्थी शरन्या काटे, इयत्ता ६वी, सुषमा पाटील विद्यालय, कामोठे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.