
रायगडच्या गोविंदा पथकांकरीता 2 लाख 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी : मनसेचे जेष्ठ प्रवक्ते प्रकाश महाजन यांची उपस्थिती लाभणार
पेण, ता. १३ ( प्रतिनिधी ) – : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेण- पाली- सुधागड मतदार संघ आणि संदिपदादा ठाकूर फाउंडेशनच्या यांच्या वतीने दहीहंडी उत्सव पेण येथील राजु पोटे मार्ग येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
रायगड जिल्ह्यातील गोविंदा पथकांसाठी यंदा 2 लाख 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी लावण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने घातलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करूनच हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाला मनसेचे जेष्ठ प्रवक्ते प्रकाश महाजन उपस्थित राहणार असल्याने या मानाच्या दहीहंडी उत्सवाकरीता रायगड जिल्ह्यातील सर्व गोविंदा पथकांनी उपस्थित राहवून मनसेच्या दहीहंडीचा उत्सव व्दिगुणित करावा असे आवाहन आयोजक मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीपदादा ठाकूर यांनी केले आहे.





Be First to Comment