
धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी) –
टाकळी (बे ) ता. जि. धाराशिव व सध्या धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवेत कार्यरत असणारे यासह सामाजिक क्षेत्रात आणि साहित्य क्षेत्रामध्ये सातत्याने लेखणकार्य करणारे प्राध्यापक राजा जगताप यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर पुणे यांनी सदरचे नियुक्ती पत्र देऊन त्याची निवड केली आहे. प्रा.राजा जगताप हे सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात यासह साहित्य क्षेञामध्ये त्यांनी सातत्याने लेखण केले आहेत.सध्या महाराष्ट्रामध्ये कथाकार, कादंबरीकार व समीक्षक अशी त्यांची ओळख निर्माण झाल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आली आहे.
प्रा.राजा जगताप यांची “आभाळ कथासंग्रह,” गाव तेथे बुद्ध विहार “कादंबरी, तिचे पञ ललित लेख संग्रह,”आंबेडकरी साहित्य समीक्षा “हा ग्रंथ इत्यादी त्यांची पुस्तके प्रकाशित असून त्यांचा ।वाळू आणि माती ” हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. प्रा.राजा जगताप यांचे साहित्य लेखन हे नियमितपणे विविध वर्तमानपत्रातून चालू असते. साहित्य क्षेत्रामध्ये प्रा.राजा जगताप यांनी चांगले लेखन केल्याने त्यांच्या लेखनाची दखल घेऊन त्यांना हे पद दिलेले आहे. त्यांच्या निवडीबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सदस्य यांच्यासह अनेकांकडून अभिनंदन करण्यात आले.मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून धाराशिव शहर व ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. राजा जगताप यांनी सांगितले.




Be First to Comment