
सिडकोच्या पूर्वाश्रमीच्या BMTC बस सेवेतील बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ आर्थिक मोबदला दिला जावा – आमदार विक्रांत पाटील ( महासचिव, भाजपा, महाराष्ट्र )
पनवेल : प्रतिनिधी
सिडको कार्यकक्षेत पूर्वी कार्यरत असणाऱ्या BMTC बस सेवेतील काम करणारे ड्रायव्हर, कंडक्टर, मेंटनन्स कर्मचारी इत्यादी कर्मचारी वर्ग बस सेवा बंद केल्याने सन 1984 पासून बेरोजगार झाले.
ही बस सेवा पुन्हा सुरू व्हावी किंवा या कर्मचाऱ्यांना अन्य कामात सामावून घ्यावे किंवा या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला द्यावा यासाठी हे कर्मचारी अविरतपणे संघर्ष करीत आहेत.या कर्मचाऱ्यांच्या 42 वर्ष प्रलंबीत मागाण्यांसाठी आ. विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात सिडको चे व्यवस्थापकीय सह संचालक श्रीं गणेश देशमुख यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक कामगार संघटना व नेते यांनी या विषयात पाठपुरावा केला होता, परंतु अजूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा यासाठी आ. विक्रांत पाटील वेळोवेळी सिडको प्रशासनाशी चर्चा करीत आहेत.
यापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 631 कर्मचाऱ्यांना PF व ग्रॅच्युइटी मिळाली देण्यात आली होती. आता हे सर्व 631 कर्मचारी तसेच सर्वच 1587 कर्मचाऱ्यांना रुपये 10 लाख इतका आर्थिक मोबदला तात्काळ दिला जावा ही मागणी आ. विक्रांत पाटील यांनी लावून धरली आहे.
अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असेल्याने आता हा आर्थिक मोबदला देताना पुराव्या करिता कमीत कमी कागदपत्र घ्यावी व कोणत्याही जाचक अटी लावू नयेत अशी मागणी ही आ. विक्रांत पाटील यांनी केली आहे.

या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून सिडको व्यवस्थापकीय सह संचालक गणेश देशमुख यांनी या पूर्व कर्मचाऱ्यांना 10 लाखाचा आर्थिक मोबदला देण्याकरिता तात्काळ ठोस कार्यवाही करण्यात येईल असे आश्वस्त केले.
सर्वच BMTC कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत आ.विक्रांत पाटील व भाजपा नेते श्रीं बाळासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.





Be First to Comment