

कामोठे : प्रतिनिधी
श्रावणसरी श्रावणमास
सर्वांसाठी आनंदाची साथ
श्रावण सरी येता दारी
मन सकलांचे आनंदून जाई.
मंगळागौर हा महाराष्ट्रातील पारंपारिक सण आहे . जो खूप आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने नवविवाहित महिलांसाठी असतो आणि त्यात गौरी देवीची पूजा करतात, ज्यामुळे त्यांना चांगले वैवाहिक जीवन आणि समृद्धी लाभते . मंगळागौर हा सण महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी नवविवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी गौरी देवीची पूजा करतात. हा सण श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी साजरा केला जातो. या दिवशी महिला पारंपारिक वेष परिधान करून देवीची पूजा करतात. पूजेनंतर महिला विविध पारंपारिक खेळ खेळतात. जसे की वटवट, फुगडी, झिम्मा इत्यादी मंगळागौर हा सण केवळ धार्मिक नसून तो महिलांमधील नातेसंबंध दृढ करतो आणि त्यांना एकत्र आणतो.
मंगळागौर सांस्कृतिक परंपरा दृढ करण्यासाठी तसेच आपापसातील नातेसंबंध वृद्धीगत करण्यासाठी वार मंगळवार दिनांक १२/०८/२०२५, रोजी माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय आणि जूनिअर कॉलेज आणि बाळूशेठ पाटील सोशल वेल्फेअर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात माता पालकांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमामध्ये विद्यालयाच्या माता पालकांनी भरघोस प्रतिसाद देऊन स्पर्धेचा आनंद लुटला. सर्व माता पालकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन मंगळागौरीच्या नृत्याचे सादरीकरण केले. सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व प्रत्येक गटातील सदस्यांनी विविध संदेश दिला. तसेच प्रत्येक गटाचे नाव हे भिन्न व संदेश देणारे होते. पालकांच्या उदंड प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष श्री बाळाराम पाटील साहेब तसेच संस्थेच्या कार्याध्यक्षा राजश्री बाळाराम पाटील मॅडम तसेच शेकाप कामोठे महिला आघाडी अध्यक्षा उषा झणझणे मॅडम आणि शिव व्याख्यात्या सुवर्णा वाळुंज मॅडम, विद्यालयाचे चेअरमन श्री शंकर म्हात्रे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच मुख्याध्यापक श्री अनिल भगत सर यांनी सर्वांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पाटील मॅडम व सौ मनीषा पयेर मॅडम यांनी केली व कार्यक्रमाची शोभा वाढवली.
झिम्मा फुगडी तळ्यात मळ्यात
……… रावांचे नाव घेते
मंगळागौरीच्या खेळात.
उखाण्यांचा कार्यक्रम खूप सुंदर रित्या सादर करुन महाराष्ट्र संस्कृती विषयी आदर व्यक्त केला.
……… रावांचे नाव घेते
मंगळागौरीच्या खेळात.
उखाण्यांचा कार्यक्रम खूप सुंदर रित्या सादर करुन महाराष्ट्र संस्कृती विषयी आदर व्यक्त केला.





Be First to Comment