
पेण, ता. १२ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीचा होत असलेला अधिकचा विस्तार फेज ३ पाहता येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यामुळे विस्तारीकरणाला शिर्की गावातील काही ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जेएसडब्लू कंपनीच्या माध्यमातून शिर्की भागातील खारेपाट भागात आज पर्यंत कंपनीने अनेक विकासात्मक कामे केली आहेत.येथे पाण्याची पाईपलाईन आणली, तलावातील गाळ काढल्याने अधिकचा पाणी वापरायला मिळाला यासह येथे स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर होता तो सोडवून नव्याने आंबेवाडी, सागरवाडी, शिर्की चाळ १ या तीन ठिकाणी स्मशानभूमी बांधल्या, अंतर्गत रस्ते तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून हर घर हर नळ ही योजना आली पण येथे पाण्याची टाकी नसल्याने त्याठिकाणी जवळपास कंपनीने दीड लाख लिटर पाण्याची टाकी बांधून दिली, शाळेसाठी शौचालय बांधले त्यामुळे सदर कंपनीचा विस्तार होणे गरजेचे असून यामुळेच येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.तर या भागातील काही तरुण कंपनीच्या भिलारी प्लांटमध्ये काम करत आहेत मात्र तिथला पिरेड संपल्यावर आमच्या तरुणांना कंपनीने येथे सामावून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.तर स्थानिक कंपनीने पाण्याचा प्रश्न सोडविल्याने कंपनीचा विस्तार होणे आमच्यासाठी आवश्यक असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला येथील महिला वर्गासह जेष्ठ मंडळी उपस्थित होते.




Be First to Comment