
कायदा सुव्यवस्था राखूनच सण साजरे करा – पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल
पेण, ता. ११ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दहीहंडी पथकांचा सराव जोरदार सुरु असून यंदा तालुक्यातील पेण, दादर सागरी, वडखळ पोलिस ठाणे हद्दीत १९८ सार्वजनिक आणि ४७० खाजगी अशा एकूण जवळपास ७०० च्या आसपास दहीहंडीचा थरार रंगणार आहे.तर मराठीची अस्मिता जपणा-या मराठी माणसांसाठी मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या पुढाकाराने १ लाख ११ हजार १११ रुपयांची लावण्यात येणारी दहीहंडी पेणकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.
पेण शहरात दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना यामध्ये सात ते आठ थरांच्या दहीहंड्या फोडण्यासाठी रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई, मुंबई येथून गोविंदा पथक येत असतात त्यामुळे सदर उत्सव पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरीक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात तालुक्यातील तीन्हीं पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेण पोलिस ठाणे १२६ सार्वजनिक, २७५, वडखळ हद्दीत १ सार्वजनिक,१०० खाजगी आणि दादर सागरी हद्दीत ७१ सार्वजनिक आणि ९५ खाजगी अशा एकूण १९८ सार्वजनिक आणि ४७० खाजगी दहीहंड्यांचा थरार पहायला मिळणार आहे.तर तालुक्यातील गोविंदा पथकांनी शासनाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन परवानगी घेऊन उत्सव साजरा करावा तसेच शहराती मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमधील दहीहंडी उत्सव साजरा होत असताना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याचा भान ठेवून यासह कायदा सुव्यवस्था राखूनच दहीहंडी उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी आयोजकांना केले आहे.
दहीहंडी हा सांस्कृतिक सण आहे आपली संस्कृती जपत असताना कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी सण, उत्सव साजरा करताना कोणतेही धार्मिक, जातीवाचक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन तसेच स्वरक्षणाची देखील कालजी घेत आणि वेळेचे बंधन पाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य करुन उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा.
जालिंदर नालकुल- पोलिस उपअधीक्षक





Be First to Comment