
रायगड : याकूब सय्यद
दि. ११ – रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आत्माराम धाबे, महिला व बालविकास अधिकारी (जि. प.)निर्मला कुचिक अन्य मान्यवर उपस्थित होते.
पेण प्रकल्पातील न्युक्लिअस बजेट २०२५-२०२६ अंतर्गत दोन सामूहिक योजना महिला बचत गटांना देण्यात आल्या. याशिवाय चार वैयक्तिक लाभार्थ्यांना थेट योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. यामुळे आदिवासी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनास मोठी चालना मिळेल.
याच कार्यक्रमात रक्षाबंधनाचा उत्सवही साजरा करण्यात आला. शासकीय आश्रम शाळा, कोळघर (अलिबाग) येथील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपस्थित सर्व अधिकारी व मान्यवरांना राखी बांधून भावबंध दृढ केला.
जिल्ह्यातील विविध भागांतील आदिवासी महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.





Be First to Comment