
मनोज पाटील : पनवेल
शुक्रवार दिनांक ०८/०८/२०२५ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले ता खालापूर जि रायगड या विद्यालयात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणांच्या निमित्ताने वृक्षाबंधन हा पर्यावरणस्नेही उपक्रम साजरा करण्यात आला.
विद्यालयातील हरितसेना आणि इको क्लबच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालय परिसरातील झाडांना विद्यार्थ्यांनी राखी बांधून आपले पर्यावरण प्रेम दाखवून दिले.विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धनाची आणि पर्यावरणाचे सजीवसृष्टीसोबत असलेले घनिष्ट नाते याची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे विभागप्रमुख विद्याधर पाटील यांनी सांगितले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .चांदणे एम. आर . यांनी या उपक्रमाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. एस सी अडसरे यांनी रक्षाबंधन या सणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.सौ एस यू पवार आणि श्री वाय डी दरेकर यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि गट कार्यातून राखी तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. राखी बनविण्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती आणि कौशल्य वापरून उत्कृष्ट राख्या तयार केल्याबद्दल मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पर्यावरण संवर्धनासाठी शुभेच्छा दिल्या.





Be First to Comment