
शिवजयंतीच्या दिवशी मास्टर मरीन कामगारांना पगारवाढ
एप्रिल 2024 पासून प्रलंबित असलेल्या मास्टर मरीन सर्व्हिसेस (PUB) या कंपनीतील सर्वेअर कामगारांचा पगारवाढीचा करार छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीच्या दिवशी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या उलवे येथील कार्यालयात संपन्न झाला. केंद्रासरकारच्या अडमुठ्या धोरणांमुळे एकीकडे मालकांना कंपनी चालवीने मुश्किल होत चाललं असतांना दुसरीकडे कामगार संघटनांना कामगारांचे हक्क अबाधित ठेवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे या दोघांची योग्य सांगड घालत कामगारांना न्याय देण्यात यश्यस्वी होताना दिसत आहेत.

या करारनाम्या नुसार कामगारांना 4500 रुपये पगारवाढ, 3लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, कामगार कायद्यानुसार बोनस, 1500 रुपये प्रत्येकी LTA देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारनाम्या प्रसंगी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत,कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, तर व्यवस्थापनातर्फे नितीन महाजन, रोनक शुक्ला, भाऊ ठाकूर, विलास शिरोळे तसेच कामगार प्रतिनिधी उत्तम पाटील, गजानन ठाकूर, परेश थळी आदी उपस्थित होते.




Be First to Comment