
महावीतरण ची थकबाकी वसूली मोहीम जोरात ; थकबाकीदार अंधारात
तृप्ती भोईर : उरण
उरण मधील वाढते औद्योगिकरण सिडकोने नवीन वसवलेल्या वसाहती त्याचप्रमाणे वाढते उद्योग व्यवसाय, त्यामुळे यासाठी लागणारा विज पुरवठा हा भरपूर प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर विज चोरी,बिल थकबाकी याचेही प्रमाण वाढतच आहे. या गोष्टीचा आढावा घेतल्यास, उरण तालुक्यातील ६७५१ ग्राहकांकडे २०फेब्रुवारी २०२५ पर्यंत असलेल्या तीन कोटी ३९ लाख ९० हजार ५३७ रुपये थकबाकी वसुलीसाठी महावितरणाने या नवीन वर्षात जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत ७२५ ग्राहकांवर तात्पुरता वीज पुरवठा बंद करण्याची कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी दिली .
उरण तालुक्यात दुकान व्यावसायिक,घरगुती आणि सार्वजनिक असे एकूण ६७ हजार ९११ ग्राहक आहेत, पैकी घरगुती ५४९० या ग्राहकांकडे एक कोटी १७ लाख ५०हजार ५२९ रुपये ,औद्योगिक कंपन्या ९० ग्राहकांकडे एक कोटी ६४ लाख २४ हजार ११९रुपये , तर दुकान व्यवसायिकरीता ११७१ ग्राहकांकडे ५८ लाख १५ हजार ८८८ अशी एकूण ६७५१ ग्राहकांकडे महावितरणाचे रुपये थकीत बीले देणे बाकी आहेत. त्यामुळे महावितरणांनी ७२५ विज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे.





Be First to Comment