
तृप्ती भोईर : उरण
मधुबन कट्ट्याचे ११२ वे कवी संमेलन विमला तलाव उरण येथे शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता कविंच्या सुंदर शब्दालंकाराने छत्रपतींच्या जोश पुर्ण पोवाड्याने आणि हृदयस्पर्शी गजलांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मधुबन कट्टा आयोजित कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ११२ वे हे कवी संमेलन यावेळी या कवी संमेलनाचा विषय होता “महागाई एक समस्या” आणि “दिवस प्रेमाचे” या दोन्ही विषयावर जमलेल्या कवींनी आपल्या सुंदर शब्दांनी जमलेल्या रसिकांवर जादू केली .
मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर कु अनुज शिवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून अंगात जोश एक प्रकारची वीरता निर्माण झाल्याने वातावरण दुमदुमून गेले.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या. तसेच यावेळी जमलेल्या कविंनी दिलेल्या दोन विषयांवर आपल्या कविता सुंदर भाषाशैलीत सादर केल्या.यामधे अप्पा ठाकूर यांच्या गझल हृदयाला स्पर्शून गेल्या. एड. अनिता ताई देशमुख यांची कविता हि मनाला स्पर्शून गेली. बाकीच्या कवींनी सादर केलेल्या कविता देखील काव्यातील अनोखे पण आणि विविध काव्यप्रकार सांगून मैफिल रंगवून गेल्या.

आजच्या या कोकण मराठी साहित्य परिषद मधूबन कट्टा कवी संमेलनाचे अध्यक्ष होते मान. श्री भुवनेश्वर पाटील निमंत्रित कवींमध्ये माननीय आप्पा ठाकूर (गझलकार )आणि माननीय एड. अनिता ताई देशमुख( कवयित्री पुणे) आजच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील सर आवाज महामुंबई च्या पत्रकार व निवेदिका सौ. तृप्ती भोईर हे होते.
यावेळी जीवनगौरव पुरस्कार माननीय श्री पांडुरंग घरत (जेष्ठ नाट्यकर्मी नवघर ) मान. श्री यशवंत कृष्णा तांडेल (जेष्ठ नाट्यकर्मी नवघर )मान.श्री संजय पाटील (सेवानिवृत्त शिक्षक सन्मान ) यांना सन्मानित करण्यात आले.
कविसंमेलन यशस्वी होण्यासाठी श्री मच्छिंद्रनाथ म्हात्रे (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद उरण) श्री रामचंद्र म्हात्रे (अध्यक्ष मधुबन कट्टा उरण) श्री संजय होळकर (जिल्हा प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद) अजय शिवकर( कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण)तसेच कोकण मराठी साहित्य परिषद उरणचे सर्व सदस्य यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मा. होळकर सर यांनी मानले.




Be First to Comment