
तृप्ती भोईर : उरण
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वाढत्या औद्योगीकरणामुळे उरण मधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे परराज्यातील व परप्रांतीय वस्ती वाढत आहे.त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख हि उरणमधील वाढत आहे.उरण म्हणजे गुन्हेगारीचे आश्रयस्थान आहे. बांगलादेशीय नागरिक उरणमध्ये सापडत आहेत दोन दिवसापुर्वी बांग्लादेशी नागरिक सापडले आणि आता याच नागरिकांमधून गोमासाची मागणी वाढत आहे. खुलेआम गोवंशिय मा़सांची विक्री होत आहे .रात्री अपरात्री तस्करी गेली ४० वर्षे उरण मधून होत आहे . असा दावा वानरसेना संस्थेचे संस्थापक सिद्धेश शिंदे यांनी केला आहे. आणि या गुन्हेगारांचा पर्दाफाश सिद्धेश शिंदे यांनी केला आहे उरणमधील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर समीर ब्रदर्स पेट्रोल पंपापुढील मार्गावर सापळा रचून सिद्धेश शिंदे व त्यांचे सहकारी यांनी गोमांस घेऊन जाणारी रिक्षा अडवून चौकशी केली असता म्हशीचे मांस आहे असे सांगून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. त्याचप्रमाणे हे जनावरांचे मांस विक्री करणारी एक महिला आहे हि धक्कादायक बाब समोर आली. दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी अकरा वाजता ची हि घटना आहे. या घटनेने परिसरात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

गोरक्षक सिध्दार्थ शिंदे यांनी या घटनेची माहिती उरण पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी चौकशी केली असता विनापरवाना गेल्या ४० वर्षापासून हे गैरकृत्य होत आहे असे उघड झाले आहे .
कलम बी. एन. एस. एस. १७३ च्या अंतर्गत, रायगड नवी मुंबई एफ आर .आय .नंबर ००२८, भारतीय न्याय संहिता बी. एन. एस २०२३चे कलम ३२५ भारतीय न्यायसंहिता बी. एन. एस .२०२३ चे कलम ३(५)’, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ ५ सी, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ ९,मोटार वाहन अधिनियम १९८८ ६६( १) या नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या सदरच्या घटनेमधील गुन्हेगारांचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे ते वानरसेना ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सिध्देश शिंदे तसेच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद सदस्य व उरण पोलीस यंत्रणा होय.महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाची पुढील चौकशी डॉ उदय ओथरे आणि पी एस आय सुरज कांबळे यांनी या मांसाचे शॅंम्पल कलीना येथे शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. नेमके हे मांस कोणत्या प्राण्यांचे आहे गोवंशीय मांस आहे की म्हैशीचे आहे. हे आता पुढील तपासणी अंती निष्पन्न होईल.



Be First to Comment