
जिल्हा परिषदेच्या क्लार्कचा ४ कोटी १९ लाखांचा भ्रष्टाचार
अलिबाग (धनंजय कवठेकर)
जिल्हा परिषदेमध्ये गेले ५ वर्ष जिल्हा परिषद रायगड येथील पाणी पुरवठा विभागाचे क्लार्क कर्मचारी नाना कोरडे ह्यांनी पगार वेतन च्या माध्यमातून सरकारी पैशाचा अपहार केला असल्याचही माहिती आ. महेद्र दळवी ह्यांनी पत्रकार परिषदेत दिली. हि रक्कम जवळपास ४ कोटी १९ लाख असल्याचे त्यांनी सांगितले. याची सखोल चौकशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना केली आहे. जिल्हा परिषदे मध्ये निवडणुका झाल्या नसल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे दळवी ह्यांनी संगीतले .
रायगड जिल्हा परिषदेमधील पाणी पुरवठा विभागात नाना कोरडे हा कर्मचारी क्लार्क महणून काम करतो तेथील कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन काढण्याचे काम त्यांचाकडे आहे. याचाच फायदा घेऊन त्यांनी ६ कर्मचारी ह्यांचे नावे पगाराव्यतिरिक्त जादाची रककम दरमहा काढून तो आपल्या स्वत:च्या आणि पत्नीच्या नावे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेल्या खात्यात जमा करीत असे.
साधारणपणे ६ ते ८ कोटीचा गैरप्रकार झाला असावा अशी प्राथमिक माहिती आहे. ह्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बास्टेवाड ह्यांची भेट घेरून हा प्रकार सांगितला असेल्याचे आ. दळवी ह्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा परिषदेच्या कोणकोणत्या हेड मधून आणखी किती गैरप्रकार झाले आहेत किती ठिकाणाहून असेच पैसे कडून शासनाची फसवणूक केली आहे ह्याबत चौकशी करावी अशा असे त्यांनी सांगितले .सरकारी पैशाचा गैरवापर होणे हे उचित नाही लोक्प्रनिधी म्हणून त्यावर माहिती घेण्याचा माझा अधिकार आहे. असेही ते म्हणाले
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक हि शेतकरी कामगार पक्षाच्या अखत्यारीत आहे.त्यांचा असा नेहमी दावा असतो कि आमचा व्यवहार पारदर्शक आहे. मागच्या नोकरभरतीच्या वेळी आम्ही स्टे आणला होता. तसा ह्यावेळी आम्ही प्रशासक बसविण्यासंदर्भात पत्रव्यवहार करणार असल्याचे आ. दळवी ह्यांनी सांगितले.असे गैरप्रकार अजून झाले आहेत का हे बघणे लोकप्रतिनिधी म्हणू न माझे काम असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ बास्टेवाड ह्यांनी याबाबत पत्रकरांशी संवाद साधताना सांगितले कि, मार्च महिना असल्याने इन्कम टक्स चे मोजमाप सुरु असताना पगारा व्यतिरिक्त काही अतिरिक्त रक्कम जवळपास ६ ते ७ लाख काढली गेली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मागील ३ वर्षाचे चेक केले असता mim मध्ये वेगवेगळ्या कर्मचाऱ्याच्या नावावर काढले गेले याची चौकशी केली असता नाना कोरडे हा ह्यांनी कोणत्याही अधिकार्याला विश्वासात न घेता बिडीओ च्या पासवर्ड वापरून तो हि पगाराची राक्म काढत असे. पगार हा खात्यात जमा करून उर्वरित रक्कम बिडीओखात्यावर जमा करून चेकबुक स्वत कडे घेऊन त्यावर बनावट सही करून ते पैसे आपल्या खात्यात वर्ग करायला. यासाठी ६ कर्मचारी च्या नावाचा वापर केला . प्राथमिक माहिती मध्ये 1 कोटी १९ लाखाचा अपहार झाल्याचे दिसून येत आहे त्यांची खाती ज्या बँकेत आहेत त्यांचा खाते उतारा काढला असता त्यावर हि रक्कम जमा झाली असल्याचे निदर्शनास आले असेल्याचे बास्टेवाड ह्यांनी सांगितले. याबात त्यांनी ज्या ठिकाणी काम केले आहे त्या विभागातही सखोल चौकशी करीत आहोत. यासाठी आम्ही डेप्यूटी लेखाधिकारी महादेव रेळे , लेखाधिकारी सतीश घोळवे, सहा. लेखाधिकारी समीर धर्माधिकारी, क्लार्क पराग खोत आणि नितीन खरमाटे ह्यांची समिती गठीत केली आहे येत्या ६ ते ७ दिवसात चौकशी पूर्ण करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून पोलासात गुन्हा दाखल करणार आहोत . कोरडे ह्यांच्यावर सध्या निलंबनाची कवी करणर असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकशी सुरु होणार असल्याचे कलताचा कोरडे ह्यांनी काल आणि आज ह्यां दोन दिवसात 1 कोटी १९ लाखपैकी ६८ लाख भरले असल्याचे डॉ बास्टेवाड ह्यांनी सांगितले.
या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येईल. त्यासाठी समितीदेखील गठित केली आहे. नाना कोरडे यापूर्वी ज्या ज्या कार्यालयांत काम करत होता, तिथंही झाडाझडती होईल. यात मोठा अपहार असल्याचा अंदाज आहे. प्राथमिक अहवाल आल्यानंतर कोरडे याच्यावर कारवाई केली जाईल. बँकेच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाईदेखील केली जाणार आहे.
डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
या प्रकरणात अनेक लोक सामील असण्याची शक्यता आहे. अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राजकीय वरदहस्त होता का, याचीही चौकशी व्हायला हवी. याची माहिती मिळताच कसून चौकशी आणि कठोर कारवाईचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले आहेत. ज्या बँक खात्यात हे व्यवहार झाले त्या बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यात मदत केलीय का हेदेखील तपासून पाहिले पाहिजे.
महेंद्र दळवी, आमदार




Be First to Comment