
नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद
नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेन तालुक्यातील रिलायन्स वसाहत जुना बी ३० बेंणसे मधील मनाली सहस्त्रबुद्धे यांच्या घरी एक लाख 40 हजार रुपये किंमतीचे नेले असून सदरील आरोपींना नागोठणे पोलिसांनी चार तासाच्या आत जेरबंद केले आहे पोलिसांच्या ह्या धाडसी कामगिरीबद्दल नागोठणे शहर तसेच नागोठणे विभागात पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेंणसे येथील जुना रिलायन्स वसाहत बी 30 मधील मनाली मिलिंद शस्त्रबुद्धे यांच्या राहते घराच्या उघड्या दरवाजाच्या वाटेने दिनांक 6 फेब्रुवारी गुरुवारी या दिवशी सकाळी पहाटे नऊ ते दहा च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश करून एका बेडरूम मध्ये फिर्यादी यांची मुलगी झोपलेली असल्याचा फायदा घेत दुसऱ्या बेडरूम मधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून जुना वापरलेले किमतीचे दागिने अंदाजे ८०,०००/ हजार नऊ ग्राम वजनाचे दोन छोट्या वाट्या व त्यामधील सोन्याचे क* रंगाची मणी असलेले एक सरी मंगलसूत्र चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील चार ग्राम वजनाचे झुमक्याची जोड त्यामधील लाल बारीक खडा दहा हजार रुपये किमतीचे मनीचे असलेले दोन जोड चांदीचे पैजण किंमत दहा हजार रुपये एक चांदीचा जास्वंद फुलाच्या आकाराचा एक मोठा व बाकी लहान चांदीचे फुल असलेला हार असे एकूण एक लाख 40 हजार रुपये किमतीचे सोना चांदी गेल्याची खबर पोलिसांना मिळताच सदर गुन्हेचे अज्ञात चोरट्याचे तपास करण्याकरिता नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ए. एस. आय.कदम पोलीस हवालदार महेश लांगी व पोलीस कॉन्स्टेबल हंबीर यांनी घटनास्थळी काम करणारे व तेथील राहणारे रहिवाशांकडे चौकशी करून त्या आधारित अज्ञात आरोपीत महिला तिचा शोध घेत तिला ताब्यात घेतले तिच्याकडे चौकशी करीत एक लाख 40 हजार चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करीत सदरचा गुन्हा उघडकीस आणला सदर नागोठणे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ०७ /२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. प्रमोद कदम करीत आहेत.
नागोठणे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी तसेच पोलीस कर्मचारी यांचे नागोठणे शहर व नागोठणे विभागातून होत आहे.




Be First to Comment