
तृप्ती भोईर : उरण
आठवते मज माझी शाळा ….
लाविते ती मजला लळा …
एक दिवस शाळेसाठी शाळेतील आठवणी जागविण्यासाठी अगदी खरं…
“शाळा “या दोन अक्षरी शब्दात किती मोठे “विश्व” सामावले त्याची जाणीव आपल्याला शाळा सोडून काही वर्षे झाल्यावर होते. शाळेतले प्रेम मित्रांसोबत केलेली मस्ती मैदानावरचे खेळ, गुरूंजीचे बोलणे ,तास चालू असताना केलेली बडबड अगदी सगळ आठवतंय .गेलेले शाळेचे दिवस परत येत नाहीत.शाळा सोडल्यानंतरही शाळा , शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर आपल्या आठवणीत राहतात.
अशा या शाळेला पुन्हा भेटण्यासाठी रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळा धोंडा येथे आजीमाजी विद्यार्थी मेळावा पार पडला. फक्त विद्यार्थीच नाही तर माजी शिक्षकांचा हि सन्मान करण्यात आला .आजी-माजी विद्यार्थी व आजी-माजी शिक्षकांचा हा मेळावा भरवण्याची संकल्पना ज्या ग्रुपने मांडली ती संकल्पना वास्तवात उतरवण्याचे काम श्री प्रदीप म्हात्रे गुरुजी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.माजी विद्यार्थिनी एकत्र येऊन भविष्यकाळातील ते मोरपंखी दिवसांच्याआनंदी आठवणीना उजाळा दिला.
माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले या मेळाव्यात शाळेतील सर्व आजी-माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्याची सुरुवात कोटगावातून सुंदर रॅली काढून करण्यात आली. आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे स्वागतानंतर या स्नेह मेळाव्याची सुरुवात झाली. कोण कुठे? काय करतो ? अशा प्रश्नांची उत्तरे यावेळी मिळाली. तसेच एकमेकांच्या भेटीने गोड हितगुज झाले .मित्र-मैत्रिणी आणि आपले जुने शिक्षक भेटल्याने माजी विद्यार्थ्यांच्या या भेटीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या सुंदर मेळाव्याचे यशस्वी नियोजन होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्राम शिक्षण समितीने मोलाचे सहकार्य केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप म्हात्रे सर व सहकारी शिक्षक वृंद, विद्यार्थी यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित सर आणि नागाव शाळेच्या शिक्षिका मेहेत्रे मॅडम यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप म्हात्रे सर यांनी सर्वांचे आभार मानले. भविष्यकाळ , वर्तमान काळ व पुढे भुतकाळाचीही सांगड घालून याही पुढे असा हा स्नेहमेळावा साजरा व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त करून या स्नेहमेळावाची सांगता केली. पण पुन्हा भेटण्यासाठी…




Be First to Comment