
पनवेल/ प्रतिनिधी
नुकतेच पनवेल तालुक्यातील वारदोली येथे रायगड भारत स्काऊट गाईड अंतर्गत एक दिवसीय कब बुलबुल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.नेरे केंद्र प्रमुख रंजना केणी यांच्या शुभहस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड, एल. टी. हिमालय वूड बॅच कब मास्टर सरिता डफळ, नेरे बीट विस्तार अधिकारी विनोद ठाकूर, पोयंजे केंद्रप्रमुख संजय केणी, नेरे माजी केंद्रप्रमुख गीता तिगडे,कळंबोली माजी केंद्रप्रमुख हिराचंद पाटील, माजी प्राचार्य युवराज सूर्यवंशी,हिमालय वूड बॅच स्काऊटर डी. के. पाटील, प्री. ए.एल. टी. बेळेकर, भिंगार शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला लवटे, बेलवली शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मोहिते, नेरे शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा ठाकूर, अखिल भारतीय शिक्षक संघ शाखा रायगड सरचिटणीस विनोद जोशी, ग्रुप ग्रामपंचायत वारदोली मा. उपसरपंच हेमंत तांडेल, उपसरपंच जानवी बताले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र बताले, उपाध्यक्ष गुरुनाथ तांडेल,पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या रणीता ठाकूर हे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांना स्काऊट गाईड स्कार्फ , वोगल व फुलझाडांचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी मान्यवरांना संचलनातून मानवंदना दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत प्रास्ताविक सादर केले. सरिता डफळ यांनी विद्यार्थ्यांना खरी कमाई चे महत्व व कब बुलबुलचे नियम सांगितले. त्याचबरोबर अंगणवाडी स्तरावर बनी टमटोला युनिट सुरु करण्याविषच्या सूचना दिल्या. हिराचंद पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की अखंड पनवेल तालुक्यात एका छोट्या शाळेने कब बुलबुल मेळावा भरवण्याची ही पहिलीच वेळ असावी, रंजना केणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शाळेची स्थिती सुधारण्यासाठी आव्हाने पेलण्याची क्षमता असावी लागते आणि ती या दोन्ही शिक्षकांमध्ये दिसून येत आहे. दोन्ही शिक्षिका अहोरात्र मेहनत घेत असून त्यांना शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ अतिशय मोलाचे सहकार्य करत आहेत हे आजच्या कार्यक्रमातून दिसून येत आहे.
विनोद ठाकूर म्हणाले की आजच्या या मेळाव्याच्या धरतीवर मी संपूर्ण नेरे बीटात अशा प्रकारचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करेन. वेळेकर सर यांनी स्काऊट गाईडचे महत्व सर्वांना समजावून सांगितले. तिगडे यांनी आजच्या संगणकीय युगात मुलांवर संस्कार करणे व स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज आहे आणि ते काम स्काऊट गाईडच्या माध्यमातून या दोन्ही शिक्षका करत आहेत हे अतिशय कौतुकास्पद आहे असे मत मांडले. संजय केणी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सर्व विद्यार्थ्यांना माननीय सरिता डफळ, वेळेकर, श्रीमती मोहिते यांनी स्कार्फ व ओगल देऊन वचनबद्ध केले. तसेच कब बुलबुल प्रार्थना व बुलबुल रिंग त्याचबरोबर बडी सलामी आरोळी घेतली. स्काऊट गाईड चा एक भाग म्हणून खरी कमाई या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलवर जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल, असे उद्गार मान्यवरांनी काढले.
मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी उमेश म्हात्रे, सुरेश म्हात्रे, निळकंठ भुरे, तानाजी भोसले,गोरख चव्हाण, फाजगे, दहेसर, अवधूत पवार, आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन तळोजे पाचनंद शाळेतील सहशिक्षिका योगिनी वैदू यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य महेश बाबरे, सुभाष तांडेल, जगदीश पाटील, सुनील कथारे, प्रगती पाटील, धनश्री पाटील, आशा भोपी, वर्षा म्हात्रे पालक व ग्रामस्थ यांनी अतिशय मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या सहशिक्षिका ज्योती भोपी यांनी केले. एकंदरीत रा. जि. प. शाळा वारदोली चा कब बुलबुल मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वच स्तरातून शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.



Be First to Comment