
तृप्ती भोईर : उरण
चिरंजीव सत्यम तृप्ती घनश्याम भोईर रहाणार द्रोणागिरी उरण हा विद्यार्थी डिसेंबर २०२४ रोजी मध्ये घेण्यात आलेल्या "कॉस्ट ॲन्ड मॅनेजमेंटअकांउंटन्सी" (सि.एम.ए.)या परीक्षेत त्याने सुयश प्राप्त केले आहे.
आय.इ.एस.जे. एन.पी.टी. शाळेच्या इंग्रजी माध्यमातून सत्यम या विद्यार्थ्याने दहावी २०१५ मध्ये झालेल्या शांलांत परिक्षेत ९१ टक्के मार्कस मिळवून यश संपादन केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या बारावी बोर्ड च्या परिक्षेत नेरूळ मधील एस .आय.एस.कॉलेज मध्ये ९१ टक्के मार्कस मिळवून तो यशस्वी झाला होता, तसेच २०२० मधील बी कॉम च्या परीक्षेत ९.३२ असे मार्कस मिळवून अव्वल स्थान मिळवले होते.
सत्यम भोईर ची आई तृप्ती भोईर व वडील घनश्याम भोईर दोघेही उच्च शिक्षित तर मोठा भाऊ शुभम भोईर हा देखील एन एम आय एम एस विलेपार्ले येथील नामांकित कॉलेज मध्ये एम.बी .ए .(एच आर) पदवीधर आहे. तर शुभम ची स्नुषा बडोदरा विद्यापिठातून बी कॉम पी. जी. डी. एम उच्चशिक्षित आहे. असे घरातील वातावरणच सुशिक्षित असल्याने लहानपणापासूनच तो हुषार आहे. चित्रकला, स्केचेस यामध्ये ही तो पारंगत आहे. ज्युनियर के. जी. मध्ये असतानाच त्याने काढलेले चित्र मुंबई तील जहांगीर आर्ट गॅलरी मधील प्रदर्शनात लावले होते. क्रिकेट खेळातही तो उत्तम गोलंदाज आहे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे. हस्तकला
देखील त्याची विशेष आहे.
सत्यम भोईर हा ऑलराऊंडर आहे. त्याच्या अंगी विद्या कला आणि क्रिडेचा संगम असल्याने तो प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे. त्याचप्रमाणे नोकरी सांभाळून त्याने हे यश मिळवले आहे. अशा या हरहुन्नरी विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. तसेच त्याला पुढील भावी जीवनासाठी सिटी बेल मिडिया हाऊस कडून शुभेच्छा देत आहोत.




Be First to Comment