Press "Enter" to skip to content

नडवली येथे बाल आनंद बाजार उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

खांब,दि.१०(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील प्रा.शाळा नडवली व आदिवासीवाडी शाळा नडवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रमाचे विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी चटकदार भेळ,ताजा भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू व मनोरंजक स्टाॅल उभारून आपल्यातील उद्योजक कौशल्याचे दर्शन घडविले.विद्यार्थांना कष्टाची जाणीव, पालकांचे कष्टाची जाणीव व व्यवहार ज्ञान या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या व केंद्र प्रमुख रश्मी साळी यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक किशोर जाधव, रविंद्र लाडगे व शिक्षिका रेखा बोराडे
यांच्या परिपूर्ण नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास माजी सरपंच मनोज शिर्के,कांचन मोहिते,संतोष वाळके,सदानंद जाधव, केशव मोहिते,सुनील वरखले,कृष्णा मोहिते,अजय भोसले,नमिता भोसले,प्रेरणा मोहिते,चंद्रकांत जाधव,मधुकर जाधव व सर्व ग्रामस्थ, महिला, युवक नडवली आदींनी सदिच्छा भेट देऊन शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.