Press "Enter" to skip to content

अवघ्या सात वर्षाची चिमुरडी ठरली उरण ची जलपरी

१२ किमी घारापुरी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर अवघ्या सहा तासात पुर्ण

उरण : तृप्ती भोईर

अवघे सात वर्षे वय हे वय एखादे दैदिप्यमान किंवा कुणीही केले नसेल या वयात असे काहीतरी विशेष करणे, असे हे वय नक्कीच नाही , पण तिने हे करून दाखवले आहे .उरण मधील परिधी प्रमोद घरत चिमुकलीने अवघे वय वर्ष फक्त सात हे वय म्हणजे खेळण्याचे आहे आणि या वयात तीने हे जे धाडस केले आहे याला तोड नाही.
खेळण्याबागडण्याच्या या वयात यु ई.एस शाळेत इयत्ता पहिलीत शिकणारी परिधी घरत हिने या वयात काहीतरी आगळं वेगळं करून दाखवण्याचे धाडस या मुलीने केले आहे.

फक्त एक वर्षाचा पोहण्याचा सराव असलेल्या या चिमुकलीने १२ किमी घारापुरी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर अवघ्या सहा तासात पुर्ण केले. सकाळी ४.३८ ते १०.३० पर्यंत तीने हा जलप्रवास मोठ्या जिद्दीने आणि धाडसाने पूर्ण केला. आपल्या श्वासावर, हातापायांची हालचाल, पाण्यात पोहतअसताना पाण्याचे तापमान, पाण्याची खोली, या सर्वांवर लक्ष केंद्रित करून एकाग्रतेने आपले ध्येय परिने साध्य केले.
परिचा पोहण्याचा हा सराव अत्यंत कमी कालावधी चा आहे. एका वर्षात तीने हे पोहण्याचे एवढे मोठे अंतर तीने सर केले. उरण नगरपरिषदेच्या जलतरण तलावामध्ये ती सराव करते या इव्हेंट साठी परि रोज सकाळी दोन ते तीन तास सराव करत होती. परिला धावणे व पोहण्याची आवड आहे.

आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे ती एवढे मोठे धाडस करू शकली. आईवडिलांकडून परिला “तु तुझी पोहण्याची आवड पूर्ण कर आम्ही तुला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रयत्न करू” असे प्रोत्साहन मिळत आहे.

परिच्या या नेत्रदीपक यशासाठी तीचे प्रशिक्षक विजय कुमार बेहरा यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोणत्याही मोठ्या ॲकॅडमीत जाऊन ती पोहण्याचा सराव करते असे नाही तर उरण नगरपरिषदेच्या जलतरण तलाव मध्ये ती सराव करते. आणि तिचा हा पहिलाच प्रयत्न होता.
परिसाठी शुभेच्छा देण्यासाठी तीचे शिक्षक, नातेवाईक, शेजारी मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या तर पोहण्याचा विक्रम केल्यानंतर परिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या धाडसी शिव कन्येचे अभिनंदन होत आहे व तीला पुढील जल प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.