
जी टी पी एस…उरण प्लांट वसाहत येथे महाजनको (एम एस ई बी )राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
उरण : (धम्मशील सावंत)
जी टी पी एस उरण प्लांट वसाहत येथे महाजनको (एम एस ई बी )राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा रविवार १९/१/२०२५ ते २३/२/२०२५ या दरम्यान
घेण्यात आली…सदर स्पर्धे साठी महाजनकोच्या राज्यातील ११ विभागातील बुद्धिबळ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात पुरुष गट ४४ तर महिला गटात…१० स्पर्धक सहभागी होती. त्यात प्रामुख्याने नाशिक, नागपूर, चंद्रपूर. पुणे. भुसावळ, खापरखेडा , कोराडी., मुंबई आणि रायगड उरण येथील स्पर्धक सहभागी झाले होते.

पुरुषांचे ७ राऊंड (फेरी ), तर महिलांचे ४ राऊंड घेण्यात आले. ही संपूर्ण स्पर्धा क्लासिकल पद्धतीने खेळविण्यात आली… या स्पर्धे मध्ये अनुप गावंडे, पारस औष्णिक विद्युत केंद्र विशाल आहेर, नाशिक औष्णिक विद्युत केंद्र हे पुरुष गटात प्रथम आणि द्वितीय आले…
तर महिला गटात शमीम शेख, परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रतिक्षा काळे, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र ह्या प्रथम आणि द्वितीय आल्या
सदर स्पर्धेचे उद्घाटन श्री सुनील आव्हाड सर मुख्य अभियंता जी टी पी एस.. यांचे हस्ते झाले… या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून
सिनियर नॅशनल ऑर्बिटर श्री संदीप पाटील यांनी काम पाहिले..
तर उप पंच म्हणून श्री आदित्य पाटील , कु. अमर काळे…सौ अश्विनी धोत्रे मॅडम यांनी काम पाहिले.. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी साठी…श्री सोमेश्वर सिंगर अभियंता जी टी पी एस , श्री दिपक पाटील , श्री मोतीसागर सोनावणे, अभियंता जी टी पी एस, श्री सिद्धार्थ पाटील अभियंता, श्री समीर घरत यांनी अथक परिश्रम घेतले…




Be First to Comment