Press "Enter" to skip to content

३८ वी नॅशनल गेम उत्तराखंड २०२५ मध्ये होणा-या तायक्वान्डो स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांची प्रमुख पंचपदी निवड

पनवेल (प्रतिनिधी).
३८ वी नॅशनल गेम मिलन हॉल मानसकानंद खेळ परिसर गोलपार उत्तराखंड २०२५ मध्ये दिनांक ४ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणा-या तायक्वांदो स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणुन रायगड चे सुपूत्र तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तसेच कॉमनवेल्थ तायक्वांदो युनियनचे सदस्य सुभाष पाटील यांची पंचपदी निवड झाली आहे.

सुभाष पाटील हे ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट व आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंच म्हणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा दक्षिण कोरिया २००४ भारतीय संघाचे कोच, पंच पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०१० भारत, पंच कॉमनवेल्थ स्पर्धा २०११ आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा दक्षिण कोरिया २०११ भारतीय संघाचे कोच, पंच ११ वी इजराइल ओपन तायक्वांदो स्पर्धा २०१३ पंच ८ वी स्कॉटिश ओपन स्पर्धा २०१३ स्कॉटलंड, संघप्रमख कोरिया ओपन २०१४, आरतराष्ट्रीय साफ गेम २०१६, लुसोफोतीया तायक्वांदो स्पर्धा नियंत्रक २०१४ गोवा, कॅनडा ओपन व पैरा ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०१७ पंच २०२३ वर्ल्ड तायक्वांदो प्रेसिडंट कप व ओशियाना पॅरा व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ३७ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा गोवा २०२३ येथे ही ताईकवांडो खेळाचे टेक्निकल प्रमुख म्हणुन होते व ती स्पर्धा यशस्वी पार पाडली होती म्हणुन पुन्हा सुभाष पाटील यांच्यावर जबाबदारी दिली आहे तसेच आतापर्यंत अनेक स्पर्धा परिक्षा मध्ये सहभागी होऊन सुभाष पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

३८ वी नॅशनल गेम उत्तराखंड २०२५ स्पर्धेसाठी सुभाष पाटील हे ४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंड येथे रवाना होणार आहेत. त्यांना या स्पर्धेसाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) ) व रायगड तायक्वांदो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.