Press "Enter" to skip to content

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर !

पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा ! सनातन संस्थेची मागणी

मुंबई उच्च न्यायालयाने आज कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या ६ जणांना जामीन दिला. या निर्णयाचे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना मनापासून स्वागत करत आहेत. ‘हिंदु दहशतवादा’ची थियरी सिद्ध करण्यासाठी पद्धतशीरपणे ‘फेक नॅरेटिव्ह’ निर्माण केला गेला आणि पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अडकवण्यात आले. पानसरे कुटुंबीय, तसेच अन्य तथाकथित पुरोगाम्यांनी या प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जामीन मिळू नये, यासाठी खूप आटापिटा केला होता. सातत्याने माध्यमांसमोर दिशाभूल करणारी भूमिका मांडून न्यायालय आणि पोलीस यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत होते. या खटल्यात कोल्हापूरमध्ये पानसरे कुटुंबीय आणि पुरोगामी वापरत असलेले दबावतंत्र लक्षात घेता हा खटला यापुढेही कोल्हापूर येथे चालवला गेला, तर न्याय मिळण्यात अडचण निर्माण केली जाईल, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने न्यायालयाकडे विनंती करत आहोत की, पानसरे हत्या प्रकरणाचा खटला कोल्हापुरात न चालवता त्रयस्थ ठिकाणी चालवावा, अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मांडली.

पाकिस्तानातून आलेल्या आतंकवादी अजमल कसाबला आतंकवादाच्या घटनेत वकील दिला जातो; मात्र गरीब घरातील या हिंदू मुलांना वकील मिळू न देता तुरुंगात सडवण्याचा प्रयत्न हे पुरोगामी करत होते. एकीकडे न्याय मिळावा, असा टाहो फोडणारे पानसरे कुटुंबीय ‘हा खटलाच चालवू नये’, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन याचिका करून खटला लांबवत होते. पण आज या सर्व हिंदुत्वनिष्ठांना तब्बल सहा वर्षांनी जामीन मिळाला, याबद्दल आम्ही ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो, असे श्री. अभय वर्तक म्हणाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.