
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
पनवेल (प्रतिनिधी) श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील एच एस सी आणि एसएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी ह. भ. प. वैकुंठवासी शालुबाई सिताराम पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी सरपंच रमेश पाटील यांनी विद्यालयासाठी ३ लाख २५ हजार रुपये खर्च करून उभारलेल्या स्वच्छतागृहाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, दुंदरे सरपंच सुभाष भोपी, माजी सरपंच रमेश पाटील, विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेश भोपी, बळीराम भोपी, वंदना भोपी, दीपक पाटील शांताराम चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंखे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या तसेच मागील वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत पहिले तीन आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच नमो चषक २०२५ स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटातील विद्यालयाला चौथा क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा आणि क्रीडा शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चंद्रपूर येथे होणाऱ्या खुल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या निखिल भोपी याचा संपूर्ण खर्च करण्याचा आश्वासन निखिलला दिले आहे तसेच विद्यालयासाठी १० स्मार्ट ब्लॅक बोर्ड उपलब्ध करून देणार आहेत. या कार्यक्रमा वेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यालयासाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील यांनी केल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुकही केले.

Be First to Comment