
आज दिनांक २५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधूनपनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दापाश करत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे असे निवेदन तहसीलदार कार्यालय मध्ये देण्यात आले.
सदर वेळी पनवेल शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कामोठे अध्यक्ष जयेश लोखंडे,शशिकला सिंग, राकेश चौधरी, खांदा कॉलनी अध्यक्ष जयवंत देशमुख, सागर पगारे, पनवेल शहर अध्यक्ष लतीफ शेख, जोस जेम्स, अरुण कुंभार, शैलेश पाठने, नगरसेविका मंजुळा कातकरी, सुधीर मोरे, आदम ढलाईत व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




Be First to Comment