
अलिबाग (प्रतिनिधी)
आपल्या स्वनिधीतील ५टक्के निधी हा दिव्यांग बांधवांच्या कल्याणार्थ उपयोगात आणावा,असा निर्णय महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी घेतलेला असून,त्याप्रमाणे आपल्या हद्दीतील दिव्यांग बांधवांचे सबलीकरण करण्याचे उपक्रम ग्रामपंचायत राबवीत असते.तसेच,ज्या आपल्या घरात मुलीचा जन्म झाल्यास,त्या नवजात कन्येच्या नावे देखील पाच हजार रुपये मुदतठेव ठेवण्याची योजना शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली असून,ही योजना राबविणे ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे.
मापगांव ग्रामपंचायतीने ह्यावर्षी 42 दिव्यांगांना तर, 6 नवजात कन्यांना ह्या योजनेचा लाभ देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.मात्र,ह्या योजना ग्रामपंचायतीच्या आधीच्या सरपंच-सदस्यांनी चालू केल्याचे सांगत जनतेची दिशाभूल केली आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फायदा करून घेण्याचा हास्यास्पद प्रकार केला.
विशेष म्हणजे,सद्या मापगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून कार्यभार पाहत असलेल्या श्री.ज्ञानेश्वर साळावकर आणि ग्रामसेविका सौ.भोईर मॅडम ह्यांनी पक्षपात करत,माजी सरपंच श्री.सुनील थळे,सुनावली येथिल व्यवसायिक श्री.सचिन घाडी,माजी सदस्य श्री.किशोर सातमकर,एका गटाच्या अशा ठरावीक ग्रामस्थांना निमंत्रित करून अन्य सर्वसामान्य ग्रामस्थांचा अनादर केलेला आहे.ह्या प्रकाराबाबत आता मापगांव ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून,दूजाभाव करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांचे त्वरित निलंबन करण्याची मागणी सुरू झालेली आहे.




Be First to Comment