अलिबाग (धनंजय कवठेकर)
एल.एस.पी.एम. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग अंतर्गत राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम २०२५ च्या अनुषंगाने १३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीमध्ये महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम २०२५ साजरा करण्यात आला.
यामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्याने निबंध, रांगोळी, पोस्टर, घोषवाक्य, पथनाट्य स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग दर्शविला या कार्यक्रमामध्ये १३ जानेवारी या दिवशी निबंध व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १४ जानेवारी या दिवशी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच १५ जानेवारी पोस्टर व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर दिनांक १७ जानेवारी या दिवशी स्पर्धांचे उद्घाटन व परीक्षण करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी उद्घाटक व परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तसेच रायगड जिल्हा मतदार जनजागृती युथ आयकॉन म्हणून तपस्वी गोंधळी लाभल्या होत्या. त्यांनी वरील स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम बघितले. तसेच स्पर्धा विश्व अकॅडमीच्या दिव्या मोकल उपस्थित होत्या.
प्राचार्य लीना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका हर्षदा पूनकर यांनी विशेष मेहनत घेतली.
Be First to Comment