Press "Enter" to skip to content

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवा नोडमध्ये दिनांक २३ ते २५ जानेवारी पर्यंत होणाऱ्या ‘नमो चषक’ क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. २०) उलवा नोड येथे नमो चषक स्पर्धास्थळी अंतिम आढावा बैठक पार पडली. 

             पनवेल आणि उरण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो चषक २०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात आयोजनातील विविध समित्यांची बैठक पार पडली. या बैठकीस उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, भाजपचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उलवा नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, विजय घरत, भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, सागर ठाकूर, कबड्डी प्रशिक्षक सुर्यकांत ठाकूर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शरीरसौष्ठवपटू दिनेश शेळके, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, ज्योत्सना ठाकूर,  स्वप्नील ठाकूर, रोहित जगताप,  किशोर पाटील,  अंकुश ठाकूर, व्ही.के. ठाकूर, मदन पाटील, सुधीर ठाकूर, दिनेश खानावकर, रोहित जगताप, सुहास भगत, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, धीरज उलवेकर, गौरव कांडपिळे, नाना देशमुख, सीमा पाटील, यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

          नमो चषकच्या यशस्वी नियोजनासाठी विविध प्रकारच्या १७ समिती स्थापित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने या समितीकडून आपापल्या कामाचा आढावा घेण्यात आला. उत्कृष्ट आणि भव्य आयोजनातून हा नमो चषक यशस्वीपणे करण्यासाठी समितीमधील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केली. दरम्यान त्यांनी येथे होणाऱ्या स्पर्धेच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी केली. तसेच मार्गदर्शक सूचना केल्या. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.