
पनवेल : प्रतिनिधी
व्ही के हायस्कूल पनवेलच्या 1996 सालातील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मानघर येथील साक्षी फार्म हाऊस येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
1996 सालामध्ये दहावीला असणारे हे विद्यार्थी आता खाजगी क्षेत्रात वरिष्ठ पातळीवर तसेच काही विद्यार्थी सैन्य दलात देखील आहेत त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून परदेशात देखील नावलौकिक मिळविला आहे. असे अनेक माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
हे माजी विद्यार्थी नेहमीच सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर असून या विद्यार्थ्यांमार्फत आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी 2015 सालामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत केली होती.
आम्ही व्ही के हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून आमच्याकडून समाजाप्रती आपली बांधिलकी नेहमीच जपली जाते. मी या ठिकाणी या परिसरातील सामाजिक संघटनांना आवाहन करू इच्छितो की त्यांना जर कोणती मदत हवी असेल तर आम्ही आमच्या पात्रतेनुसार ती जरूर करू त्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा.
– प्रसाद गायकवाड ( 9820563131 )




Be First to Comment