Press "Enter" to skip to content

पटेल ज्वेलर्स उरण शाखेकडून हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा


तृप्ती भोईर : उरण

मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत सुरू असणारे हळदीकुंकू म्हणजे महिलांसाठी वेगळीच पर्वणी असते. हळदी कुंकू म्हणजे धार्मिकते सोबतच एकमेकींविषयी बांधिलकी जपणारा ,स्नेह वाढविणारा असा हा समारंभ आहे. ग्रामीण भागात किंवा शहरी घरगुती , सोसायटी,सामाजिक मंडळ, राजकीय व्यासपीठ अशा सर्व ठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आपले व्यावसायिक संबंध जोपासण्यासाठी , ग्राहकांसोबत ऋणानुबंध राखण्यासाठी शॉपिंग सेंटर, मॉल मध्ये ही हळदीकुंकू समारंभ साजरे होत आहेत.
धार्मिकता व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पटेल ज्वेलर्स उरण शाखे तर्फे हि उरणमधील महिलांसाठी भव्य स्वरूपात शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी श्रीराम मंदिरात हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.

पटेल ज्वेलर्स या व्यावसायिक उद्योगाची सुरूवात १९९२ रोजी पनवेलचा “जवेरी बाजार “अशी ओळख असलेल्या जोशी आळीत एका छोट्याशा दुकानात झाली.”विश्वास हीच परंपरा “हे ब्रीदवाक्य असलेल्या ब्रँड ने काही वर्षातच ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले.

श्री मगनभाई पटेल ,श्री प्रफुल पटेल व श्री नवनीत पटेल यांनी १९९२ मध्ये पनवेल मध्ये १५० चौरस फुटाच्या दुकानांमध्ये पटेल ज्वेलर्स या नावाने दुकान सुरू करुन एवढेसे रोप लावले.पण आज पटेल बंधूंचे ग्राहकांशी अदबशीर, आदराने बोलणे, सेवेतील तत्परता, सोन्याची शुद्धता, व्यवहारातील पारदर्शकता या वैशिष्ट्यामुळे आज पटेल ज्वेलर्स नाव आपल्या व्यवसायात प्रसिद्ध होवून नावलौकिक कमावले आहे. त्यामुळे ग्राहकांचा पावले आपोआप या दुकानाकडे वळत आहेत. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढल्याने जागाही अपुरी पडत असल्याने दुकानाचा विस्तारा करिता आता या दुकानाचे भव्य शोरूम मध्ये रूपांतर झाले आहे.पहिला मजला हा ७ हजार फुटांमधे अत्याधुनिक सुविधांसह विस्तारला आहे. पनवेल रायगड व नवी मुंबई वासियांसाठी भव्य असे शोरूम खुले केले आहेत. आणि आता दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या विस्तार होत आहे. व या जागेत मोठ्या शोरूमचे काम चालू असून लवकरच १२ हजार फुटाचे शोरूम ग्राहकांसाठी खुले करण्यात येणार आहे .

पनवेलचे पटेल ज्वेलर्सच्या शाखा महाड ,माणगाव , अलिबाग पेण, रोहा ,उरण, रायगड, नवी मुंबई ,तळोजा, कल्याण, ठाणे ,डोंबिवली पर्यंत प्रसिद्ध असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.खरेदीसाठी गर्दी होत आहे.

दिनांक १८ जानेवारी रोजी पटेल ज्वेलर्स उरण शाखेतर्फे आयोजित केलेल्या भव्य हळदी कुंक समारंभात उरण व उरण च्या आजुबाजूच्या गावांतून आलेल्या महिलांनी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला. फक्त हळदीकुंकू च नाही तर महिलांसाठी छोटे छोटे खेळ खेळले गेले. या खेळातही सहभागी होऊन महिला वर्गाने आनंद घेतला. तसेच खेळात विजयी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे हळदीकुंकू साठी आलेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू सौभाग्याचे लेण नथ देण्यात आली व नाष्टा देण्यात आला सोबत तीळगूळ देण्यात आले.

पटेल ज्वेलर्स कडून आयोजित केलेला हळदीकुंकू समारंभ यशस्वी व रंगतदार होण्यासाठी जनरल मॅनेजर प्रतीक्षा डायस यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच पटेल ज्वेलर्स संपूर्ण टिम यांच्या मेहतीने व प्रतीक्षा डायस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुंदररीत्या व सुरळीत पार पडला. सुमारे ३५० हुन अधिक संख्येने महिला वर्ग या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.