
उलवे नोड, ता. १८ : दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) पनवेलच्या वार्षिक विविध गुणदर्शन महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१७) दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला.

दिल्ली पब्लिक स्कूल पनवेलच्या वार्षिक अहवालाचे वाचन विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे केले. दिल्ली पब्लिक स्कूल पनवेल येत्या काही वर्षांत विद्यार्थ्यांना कालानुरूप उत्तमोत्तम शिक्षण देऊन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तत्पर असेल, असा विश्वास प्राचार्यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थी आणि पालकांनी दिल्ली पब्लिक स्कूल पनवेलचा परिसर फुलला होता. अतिशय शिस्तबद्धपणे कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थांचा बहारदार विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला.




Be First to Comment