
उरण तालुक्यातील जासई येथील १९८४ सालच्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी राज्याचे वने मंत्री गणेश नाईक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,
कामगारनेते महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, चंद्रकांत घरत, सुरेश पाटील, भूषण पाटील, राजेश गायकर, जे. डी. तांडेल यांच्यासह हजारो नागरिकांनी विनम्र अभिवादन केले.




Be First to Comment