
मुलुंड प्रतीनीधी : सतिश वि.पाटील
जगभरातील गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल सारख्या कंपन्यांना AI टेक्नॉलॉजीची चीप पुरवणारी NVIDIYA ही एक नंबरची अमेरीकन कंपनी आहे. 4 ट्रिलीयन (4 लाख करोड ) बजेट असणाऱ्या या कंपनीचा मालक श्री जेन्सन हुआन याने नुकतीच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपले विटावा कोळीवाड्यातील बांधव श्री संजय केणी यांची मुलगी कुमारी मानसी संजय केणी या कंपनीत AI चीप डेव्हलेपमेंट करणाऱ्या टीमची हेड आहे. नुकतंच कुमारी मानसी संजय केणी हिचं श्री जेन्सन हुआन यांनी तिच्या कामा बद्दल विशेष कौतुक केलं. ही आपल्या कोळी जमातीसाठी, विटावा कोळीवाड्यासाठी आणि मानसीच्या आई-वडीलांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
येत्या काही वर्षांत भारतात प्लांट चालू करण्याचा या कंपनीचा विचार असून त्या निमित्त सर्वे करण्यासाठी येणाऱ्या टीम मध्ये कुमारी मानसी संजय केणी हिचा समावेश करण्यात आला आहे.अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !




अभिनंदन कु. मनाशी केणी चे, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
कु. मनशी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !