झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलतर्फे मुंबईत ८ हजार लिटर सॅनिटायजरचे मोफत वाटप
सिटी बेल | मुंबई |
सध्या कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना आपण करीत आहोत. कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी कमी होत असली तरीही अजूनही आपण कोरोना महामारीवर पूर्णपणे विजय मिळविलेला नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टंसिंग व हॅन्ड सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे व याचीच दखल घेऊन घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलतर्फे मुंबईत विविध ठिकाणी ८ हजार लिटर हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप केले.
यामध्ये मुंबई महानगर पालिका (एन वार्ड ) सफाई कर्मचारी, फिनिक्स मॉल तसेच घाटकोपर पूर्व व पश्चिम येथील रहिवाशी संघटना तसेच नेव्हल डॉकयार्ड येथिल कर्मचाऱ्यांना मोफत हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
याविषयी अधिक माहिती देताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे विक्री आणि विपणन प्रमुख आशिष शर्मा म्हणाले, ” कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत खाजगी व सरकारी आस्थापने यांनी एकत्रित येऊन काम केले आहे. कोरोनाची महामारी दूर करावयाची असेल तर मास्क व सॅनिटायझरचा वापर नियमित केला पाहिजे म्ह्णूचच आम्ही सामाजिक बांधिलकेतून मोफत सॅनिटायझरचे वाटप केले. यापुढे गरज लागल्यास आम्ही अजून सॅनिटायझर उपलब्ध करून देणार आहोत.”








Be First to Comment