सिटी बेल | मुंबई |
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा येथील विद्यापीठाला आजच्या दिवशी देण्यात आले होते.या लढ्यात शहीद झालेल्यांना पोशिराम कांबळे,प्रतिभा तायडे,शरद पाटोळे, जनार्दन मवाडे, सुहासिनी बनसोडे, दिलिप रामटेके, गौतम वाघमारे, चंदर कांबळे,अविनाश डोंबरे, गोविंदराव भुरेवाड,नारायण गायकवाड, रोशन बोरकर यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मराठवाडा येथील विद्यापीठाला नाव देण्यात आले
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधुन १४ जानेवारीला पवईतील आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना चालना देत शहीद झालेल्या भिमसैनिकांना पवईतील सामाजिक कार्यकर्ते राहुल गच्चे व त्याचे सहकारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील आठवणींना भदंत शिलबोधी यांनी उजाळा देत नवतरुणांना लढ्याची माहिती देण्यात आली.हा लढा यशस्वी करणाऱ्या मागे असलेल्या भिमसैनिकांन यांच्या बद्दल देखील उजाळा देण्यात आली.
नामविस्ताराचा दिनाचा कार्यक्रम हा पवईतील हिरानंदानी येथील जय भिम नगर बुद्ध विहारात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे शहीदांना अभिवादन देखील करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पवईतील सामाजिक कार्यकर्ते राहुल गच्चे यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमात डी. डी.वाघमारे, भानुदास मोरे,एन.डी अभंगे, श्रीधर पोपलवाड,रमेश आहिरे, लक्ष्मण वाघमारे, रवींद्र बारसिंगे,विशाल मोरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होत कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.








Be First to Comment