Press "Enter" to skip to content

बी.के.बिर्ला कॉलेजमध्ये कारगिल विजयदिन सोहळा

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी शहिदपत्नी भाविका मोरे आणि कालवलीचे राष्ट्रपतीपदक प्राप्त शांताराम महाडीक यांचा सत्कार

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील कोंढवी येथील शहिद भरत मोरे यांच्या पत्नी भाविका मोरे आणि कालवली येथील राष्ट्रपती पदक प्राप्त शांताराम महाडीक यांचा कल्याण येथील बी.के.बिर्ला कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ऍण्ड कॉमर्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कारगिल विजयदिन सोहळयानिमित्त कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी लष्करी थाटात आयोजन करण्यात आल्याने सर्वांनाच अप्रूप वाटत होते.

कल्याण येथील बी.के.बिर्ला कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एनसीसी युनिटने शहिद जवानांच्या कुटूंबियांचा तसेच विशेष सेवा पदक प्राप्त जवानांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित केला असता पोलादपूर तालुक्यातील कोंढवी येथील कारगिल युध्दामधील शहिद जवान भरत मोरे यांच्या पत्नी भाविका मोरे तसेच ऑपरेशन मेघदूतमध्ये विशेष सेवा पदक प्राप्त झालेले कालवली गावाचे सरपंच व सेवानिवृत्त सैनिक शांताराम महाडीक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रोझ क्लब कल्याणचे प्रेसिडेंट संतोष चितलांगे तसेच सेन्चुरी रेयॉन शहाडचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ओ.आर.चितलांगे, प्राचार्य डॉ.अविनाश पाटील आणि एज्युकेशन डायरेक्टर डॉ.नरेश चंद्रा यांच्यासह एनसीसीचे कॅडेटस् आणि भारतीय सेनादलातील रिटायर्ड अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कारगिल विजय दिनानिमित्त झालेल्या या सैन्यदलाशी संबंधित व्यक्तींचा व शहिद कुटूंबियांच्या गौरवाच्या कार्यक्रमामध्ये पोलादपूर तालुक्यातून शहिदपत्नी भाविका भरत मोरे आणि कालवलीचे सरपंच शांताराम महाडीक यांना गौरविण्यात आल्याने पोलादपूर तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.