Press "Enter" to skip to content

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे तर्फे सत्कार

डॉ. संतोष बोराडे राष्ट्रभक्ती राज्यस्तरीय मराठी साहित्य ‘संगीतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

संगीत, आरोग्य आणि अध्यात्म अशा त्रिवेणी संगमाचा अभ्यास करणारे खालापूर तालुक्यातील कलोते येथे राहणारे डॉ. संतोष बोराडे, यांचा पुणे येथे राष्ट्रभक्ती राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘संगीतरत्न’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांचेमार्फत या कार्यक्रमाचे पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक रामचंद्र ढेकणे, न्यायमूर्ती मदन गोसावी, डॉ. बबनजी जोगदंड, न्यायमूर्ती सु.बु. बुक्के, मा. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. संतोष बोराडे, रायगड यांना विज्ञाननिष्ठ व समाजाभिमुख प्रामाणिक संगीतसेवेसाठी ‘संगीतरत्न २०२२’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तब्बल ३५०० हुन अधिक कार्यक्रमांतून देश-विदेशात भारतीय संस्कृतीची आणि संगीताची वैज्ञानिक विचारधारा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहेत.डॉ. संतोष बोराडे यांनी गेली 21 वर्षे अविरतपणे संगीत सेवा केली आहे. ‘जीवनसंगीत’ कार्यक्रम विविध शहरांतुन सर्वसामान्य जनतेपर्यंत ते पोहोचवीत आहेत.या कार्यासाठी त्यांना या आधीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

नॅशनल नोबिलिटी पुरस्कार २०१९, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते देण्यात आला. इनोव्हेटिव्ह इंडियन यंगस्टर पुरस्कार २०२०, दुबई मल्टी कम्युनिटी सेंटर, दुबई
ग्लोबल एक्सलन्स पुरस्कार २०२१, हैदराबाद, प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार, २०२१, हरियाणा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, २०२१, महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, पुणे,
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन केंद्र, रामेती, पुणे महाराष्ट्र पोलीस, सर्व शासकीय – निमशासकीय विभाग, माधवबाग आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र, खोपोली, तसेच विविध वैद्यकीय शाखांमधून काम करणारे हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजस, उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था, कारखाने व कार्यालयांबरोबर संलग्नपणे काम करून डॉ. संतोष बोराडे यांनी जीवन आणि संगीताचा एकत्रपणे अभ्यास करणारा एक नवा समाजवर्ग घडविला आहे.

संगीत व अध्यात्म या विषयांचे शिक्षण विविध क्षेत्रातील तज्ञ गुरूंकडून घेत असून, पंडीत शंकरराव वैरागकर, जयपूर पतियाळा घराणा यांचे कडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण.
संगीतकार यशवंत देव, मुंबई, संगीतकार गोपाळ ढवळीकर, गोवा, गझलगायक प्रकाशजी शहा, हार्मोनिअम वादक श्री. संतोषजी घंटे, श्री. नसीम खान, मास्टर तुलसीदासजी पवार, भजन गायक भगवान महाराज आपटेकर आदी तज्ञांच्या मार्गदर्शनातून विविध सांप्रदायिक भजन परंपरा व शास्त्रीय संगीत घराण्यांचा सखोल व तुलनात्मक अभ्यास केला.

गेली एकवीस वर्षे अथक परिश्रम करत जवळपास साडे तीन हजाराहुन अधिक कार्यक्रमांतून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे .अडीच लाखाहून अधिक विध्यार्थी, पंधरा हजाराहून अधिक व्यावसायिक आणि आयएएस व आयपीएस अधिकारी,
वीस हजाराहून अधिक मनोकायिक व्याधींनी ग्रस्त रूग्ण, शेकडो ज्येष्ठ नागरिक संघ, महिला तसेच समाजाच्या वेगवेगळया स्तरांपर्यंत त्यांनी आपला विषय पोहोचवला आहे . महाराष्ट्रातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींपासून ते युरोप, अमेरिका, जपान, दुबई सारख्या देशांतील उच्चपदस्थ व्यावसायिक अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी भारतीय संगीताची ही अभिजात ठेव प्रभावीपणे पोहोचवली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.