Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन

ठाणे येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनामध्ये रायगडचा ठसा

समाजाने देशातील लोकशाही टिकविण्यासाठी प्रसार माध्यमांची उपयुक्तता ओळखुन पत्रकार अन् वृत्तपत्रांना मदत करावी – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

सिटी बेल | पोलादपूर |

प्रसारमाध्यामाचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही कमकुवत होईल, त्यामुळे समाजानेच माध्यमांची उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत करावी. पत्रकारांनीही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी, म्हणजे विश्वास वाढेल, असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगून प्रबोधनाचे मार्केटिंग होणार नाही याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी, असे आवाहनदेखील केले.

ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या 16 व्या अधिवेशनप्रसंगी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील बोलत होते. याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर आणि शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचा मान्यवरांच्याहस्ते दुसऱ्या सत्रांत सत्कार करण्यात आल्याने रायगडचा ठसा या अधिवेशनावर उमटलेला दिसून आला.

याप्रसंगी सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष राकेश टोळये, वृत्तवाहिनी संघाचे प्रदेशाध्यक्ष मनिष केत, प्रदेश प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव. मुंबई विभागीय अध्यक्ष सागर जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार अभिजीत राणे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, विदर्भ विभाग प्रमुख बाळासाहेब देशमुख, नागपूर विदर्भ पूर्व अध्यक्ष महेश पानसे, मंत्रालय संपर्कप्रमुख नितीन जाधव, प्रकाश गायकवाड, खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उदय मूळगुंद, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवान चंदे, कोकण विभागीय सचिव किशोर पाटील, कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, पश्चिम महाराष्ट्र हल्लाविरोधी समिती प्रमुख सुभाष डोके याच्यसह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यभरातून 500 पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कामाचे कौतुक करून केंद्रीय स्तरावरील मागण्यांसाठी मदत करण्याची ग्वाही दिली तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी वृत्तपत्र व पत्रकारांसमोर समस्या आणि वृत्तपत्र आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वस्तात अंक विक्री करण्याचे पारंपरिक धोरण बदलावे तर या क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगाराचे स्थैर्य मिळेल, असे सांगुन पत्रकार संघाच्या वर्षे भरातील कामाचा अहवाल सादर केला. सरचिटणिस विश्वास आरोटे व कोकण विभागिय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते पारसनाथ रायकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जेष्ठ नगरसेवक संजय तरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नाटयनिर्माते स्वर्गीय दादाजी घोसाळकर यांना कलारत्न तसेच तरुलता धानके यांना प्रशासकीय भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच शिवव्याख्याते प्रशांत देशमुख-साहित्यिक पुरस्कार आणि रायगड जिल्हा अध्यक्ष व पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

अंकविक्रीचे धोरण बदलले तरच मराठी वृत्तपत्राना स्थैर्य – प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

17 हजाराहूंन अधिक सभासद असलेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा एकमेव मोठा पत्रकार संघ आहे. असा दावा करून संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनीा, कोरोनानंतर प्रादेशिक वर्तमानपत्र समोरील आव्हानाचा सामना करण्यासाठी वृत्तपत्र आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वस्तात अंक विक्री करण्याचे पारंपरिक धोरण बदलावे लागेल,असे केले तरच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगाराचे स्थैर्य मिळेल, असे सांगुन पत्रकार संघाच्या वर्षभरातील कामाचा अहवाल सादर केला. महासचिव विश्वास आरोटे व कोकण विभागिय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन प्रदेश कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांनी मानले.

अधिवेशनात मांडले पत्रकारांचे विविध ठराव

वृत्तपत्र ग्राहकांना जीएसटीमध्ये पाच टक्केची सूट देण्यात यावी, पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, आरएनआयकडील वृत्तपत्र विक्रीचे अधिकार वृत्तपत्र चालकांना देण्यात यावे, यासह विविध महत्वाचे ठराव यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्यातील उपस्थित पत्रकारांच्या सहमतीने मांडण्यात आले. या अधिवेशनात राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र, दैनंदिनी, बॅग, हेल्मेट आदी साहित्याचे करण्यात आले.

पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अन् संघटना कटिबध्द – प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित 16व्या राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार संघाच्या मागण्या या मान्यवरांसमोर मांडल्या. यावेळी कोरोना काळात मुत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांना 50 लाखांचा विमा मिळेल, असे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आश्वासित केले. 324 पत्रकारांचा बळी गेल्याने आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे पत्रकारांची यांनी फसवणूक केली सरकार व या मंत्र्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे आरोटे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ 365 दिवस कार्यक्रम राबवत असतात.

दिवसभर सुरू असलेल्या या अधिवेशनाच्या शेवटी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी विविध ठरावांचे वाचन करून सर्व ठरावांचा पाठपुरावा संबंधित विभागांकडे करणार असल्याची ग्वाही दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.