शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ही वीरशैव लिंगायत समाजाची सर्वात प्रभावी आक्रमक व लोकशाही पद्धतीने चालणारे संघटना असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवा संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी श्री क्षेत्र कपिलधार जिल्हा बीड येथे राज्यव्यापी मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री संत मन्मथ स्वामी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. या दिवशी खूप मोठी जत्रा येथे भरत असते.
दरवर्षी शिवा संघटनेच्या मेळाव्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून हजारो भाविक भक्तगण श्री क्षेत्र कपिलधार येथे जात असतात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी, कपिलधार ला जाण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून वाहनांची सोय केली असून शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, शिवभक्तांनी शिवा संघटनेच्या खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे.
ठाणे विभाग -शिवा बिराजदार -9820535330,
डोंबिवली विभाग -रुपेश होनराव -9892869039,
रायगड विभाग -नारायण कंकणवाडी -9594862000,
रायगड विभाग -विनायक म्हमाने -9967544387,
नवी मुंबई विभाग -देवेंद्र कोराळे -9869429210
यांच्याशी संपर्क साधावे.








Be First to Comment