Press "Enter" to skip to content

शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा

18 नोव्हेंबर रोजी कपिलधार येथे शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा

उल्लेखनीय कार्य करणा-यांचा होणार ‘शिवा’ पुरस्काराने सत्कार

श्री क्षेत्र कपिलधार येथे मान्यवरांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी, वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या, गळ्यात इष्टलिंग, कपाळावर भस्म धारण करून भगवान शिव शंकराला आपले दैवत मानणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजाचे नेतृत्व करणारी एकमेव व आक्रमक लोकशाही पद्धतीने चालणारी संघटना म्हणजे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना म्हणून सर्वपरिचित आहे.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या निमित्त होणाऱ्या यात्रेमध्ये श्री क्षेत्र कपिलधार ता. जि-बीड महाराष्ट्र राज्य येथे भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित केला जातो. त्यासाठी राज्यभरातुन सुमारे 4 ते 5 लाख कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित राहतात. शिवा संघटनेच्या मागणीनुसार श्री क्षेत्र कपिलधार येथे पंढरपुर प्रमाणेच सन 2002 पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय महापूजा करण्यात येत आहे. दि 19 नोव्हेंबर 2002 रोजी पहिली शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या यात्रे निमित्त प्रतिवर्षी शासकीय महापूजा संपन्न होत आहे.

शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत सदर शासकीय महापूजा संपन्न होत असते.या वर्षी शासकीय महापुजेचे हे 20 वे वर्ष असून 18 नोव्हेंबर 2021 रोजी श्री क्षेत्र कपिलधार येथे शासकीय महापूजा व शिवा संघटनेच्या वतीने 26 व्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक राज्यातील लाखो वीरशैव लिंगायत भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले श्री क्षेत्र कपिलधार ता. जि-बीड येथे 16 व्या शतकातील वीरशैव संत श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे 18 नोव्हेंबर 2021 रोजी गुरुवारी दुपारी ठीक 4 वाजता 20 वी शासकीय महापूजा शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, महाराष्ट्राचे मंत्री ना. धनंजय मुंडे, माजी मंत्री ना. अशोकराव चव्हाण, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न होणार असून त्यानंतर या मान्यवरांच्या उपस्थितीत शिवा संघटनेचा 26 वा. राज्यव्यापी वार्षिक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते, शिवा संघटनेचे राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका स्तरावरील पदाधिकारी यांच्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीरशैव मठाचे अनेक मठाधिपती(शिवाचार्य),वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरु उपस्थित राहणार आहेत. शिवा संघटनेच्या 26 व्या राज्यव्यापी मेळाव्याचे उदघाटन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना ‘शिवा’ पुरस्काराने गौरविन्यात येणार आहे.तरि 18 नोव्हेंबर 2021 रोजी गुरुवारी होणाऱ्या या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यास शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते समाज बांधव भाविक भक्तांनी आपापल्या वाहनावर शिवा संघटनेचे बॅनर व झेंडे लावून दुपारी ठीक 3 वाजेपर्यंत श्री क्षेत्र कपिलधार ता जि-बीड येथे शिवा संघटनेच्या गणवेशात रुमाल, टोपीसह ढोल ताशांच्या गजरात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.