भक्ती-सागर सोसायटीतील आकर्षक काल्पनिक गड
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील भक्ती-सागर को-आँप.हौसिंग सोसायटीमधील बच्चे कंपनींनी आपल्या मनातील काल्पनिक गड साकारून सा-यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या कल्पनेतील गड साकारताना गड-किल्ल्यावर आढळणाऱ्या विविध गोष्टी त्यांनी साकारत असताना किल्ल्यावर गणेशाचे मंदिरही तयार केले आहे. तर किल्ल्यामध्ये विविध वेडेवाकडे रस्ते असल्याने त्यांनी साकारलेल्या आपल्या किल्ल्याला वक्रतुंड गड हे नाव देऊन आपल्या कल्पेनेतील गडाचे नामकरणही केले आहे.सोसायटी परिसरात एका जुनाट झाडाच्या खोडाचा वापर किल्ला बनविण्यासाठी केला आहे. तसेच सोसायटी परिसरात विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तूंचा वापर मोठ्या कल्पकतेने करून टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना देखील उपयोगात आणली आहे.
या सोसायटीमधील पियुष कोठेकर,प्रिया पाटील,प्रणव पोवार,सोहम पवार, निशांत कोठेकर,आदित्य सलागरे,आदित्य जगताप, वरद कवितके,कौस्तूभ पवार, स्वरूप वरणकर,रोहन पाटील, चैतन्य धुमाळ, धनश्री करकारे,पल्लवी पाटील,श्लोक कदम आदी बच्चे कंपनी एकत्र येऊन दिवाळी सणातील आपला कल्पनेतील वक्रतुंड गड साकारला आहे.
सोसायटीच्या दर्शनी भागातच त्यांनी वक्रतुंड गड साकारल्याने येणाऱ्या जाणा-यांचेही सहजच लक्ष वेधून घेत आहे.या गडावर त्यांनी छत्रपती शिवरायांचा छोटा अर्धपुतळा आकर्षकरित्या बसविला आहे.तर छोटेसे तलाव,खेडेगाव, बुरूज,शेती,बैलगाडा,जुन्या पद्धतीच्या वस्तू आदी गोष्टी ठिकठिकाणी कल्पकतेने बसवून सुंदरसा काल्पनिक वक्रतुंड गड साकारला आहे.बच्चे कंपनींने साकारलेला गड अतिशय आकर्षक असल्याने सा-यांचेच लक्ष वेधून घेत आहे. तर सोसायटीमधील सर्वच सदस्यांकडून त्यांचे कौतूकही होताना दिसत आहे.
Be First to Comment