Press "Enter" to skip to content

८०% समाजकारण २०% राजकारण या सूत्रानुसार सेनेचा समाजकारणाचा धडाका


चंद्रशेखर सोमण यांच्या पाठपुराव्याने नवीन पनवेल उड्डाणपुलाच्या रस्त्याची दुरुस्ती…!
   

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

पनवेल – नवीन पनवेल ला आपसात जोडणारा उड्डाणपूल हा एक महत्वाचा मार्ग आहे. रोजच्या रोज हजारो वाहनांची ये जा या उड्डाणपुलावरून होत असते. तेथील महामार्ग आता आणखी रुंद करण्यात आल्याने तेथील रोजची वाहनांची संख्या ही आता प्रचंड वाढली आहे. परंतु उड्डाणपुलाच्या सुरवातीलाच (पनवेल हुन न्यू पनवेल ला जाणाऱ्या दिशेला व न्यू पनवेल कडून पनवेल या येणाऱ्या दिशेला अशा दोन्ही मार्गिकांवर) खूप मोठे खड्डे पडले आहेत.

अनेकदा सिग्नल सुटल्यावर भरधाव वेगाने वाहने ब्रिजवर चढण्यासाठी सुरवात करतात. पण या खड्यांमुळे अनेकदा टू व्हीलर त्यात अडखळून पडतात. ४ चारचाकी वाहने खड्यात आपटून किंवा जोरदार आपटण्याच्या भीतीने जोरात ब्रेक चा वापर करतात व त्यामुळे वारंवार त्या भागात अपघात घडत आहेत. साधेसुधे किंवा किरकोळ नव्हे तर नागरिकांचा जीव घेणारे अपघात गेल्या काही दिवसात झाले आहेत.

या परिस्थितीची दखल घेत शिवसेनेचे स्थानिक नेते तथा पोलिसमित्र चंद्रशेखर सोमण व त्यांचे सहकारी विभागप्रमुख विश्वास पेटकर यांनी तीन दिवसांपूर्वी ११ जानेवारीला अधिक्षक अभियंता सिडको श्री. मुलाणि यांची भेट घेऊन या संदर्भात लेखी निवेदन दिले. त्या नंतर त्वरित सिडको बेलापूर येथील वाहतूक व दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता कल्याण पाटील यांच्याशी फोन व मेल द्वारे संपर्क करून या कमी त्वरित लक्ष घालायची विनंती केली. फक्त पत्र देऊन न थांबता सोमण यांनी आपला पाठपुरावा सुरु ठेऊन लागलीच दुसऱ्याच दिवशी श्री. कल्याण पाटील, सहाय्यक अभियंता सौरभ राकले व वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. मोहिते याना घाटनास्थळी बोलावून घेऊन परिस्थितीची पाहणी केली व हे काम करणे किती गरजेचे आहे या बद्दल अधिकाऱ्यांना समज दिली.

सिडको प्रशासनाने लागलीच दखल घेऊन  १३ तारखेच्या मध्यरात्री युद्धपातळीवर आवश्यक ती व्यवस्था करत उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गांच्या सुरवातिला पडलेलं खड्डे आणि ब्रिजवरीलहि दोन्ही रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवून व रस्त्यांची दुरुस्ती करून हा प्रश्न सोडवला. कामाची सुरू असलेबाबत सिडको ने कळवताच रात्री उशिरापर्यंत थांबून मा. नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी काम करवून घेतले. अवघ्या ३ दिवसात शिवसेना स्टाइल ने पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण आणि विश्वास पेटकर यांचे आभार मानले.          

एखाद्या समस्येबद्दल नुसते पत्र देऊन न थांबता विषयाच्या मुळापर्यंत जाऊन विषय पूर्णत्वास नेणे हीच बाळासाहेबांची शिकवण आहे त्यानुसार या प्रश्नाबाबतही यशस्वी पाठपुरावा करून सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या रस्त्याच्या कामाची पूर्तता ३ दिवसात करून दाखवली. सिडको प्रशासनाचे आभार

चंद्रशेखर सोमण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.