सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
सध्या ऑनलाईनचा शाळेमुळे शालेय विद्यार्थांचा मोबाईल वापर अधिक वाढला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर न पडता आल्यामूळे मोबाईल वापर दिवसभर करत आहेत. त्यांना मैदानात घाम येण्याचे खेळ खेळण्याची नितांत गरज आहे, म्हणूनच, बाळगोकुलम कंरजाडे विभागात आकर्षक मैदानी खेळ विविध सोसायटी मध्ये जाऊन घेण्यात येत आहेत. आपला पाल्य सोसायटीच्या आवारात खेळत असल्याने पालक वर्ग खूष आहेत.
श्री स्वामी विवेकानंद जंयतीच्या निमित्ताने बाळगोकुलम् तर्फे कंरजाडे येथे ढीशर्रीीीश र्कीपीं ॠराश चे आयोजन सेक्टर 3, रिलायन्स फ्रेश मॉलच्या शेजारी मैदानात आयोजित करण्यात आला होता. 10 ते 16 वयोगटातील 50 मुलामुलींनी यात उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यांना 5 गटात विभागाण्यात आले व प्रथम सुगावा चिठ्ठी मैदानात देण्यात आली. त्यावरुन उरलेल्या 9 सुगावा चिठ्ठी त्यांना शोधायच्या होत्या. शेवटची चिठ्ठी खजिना किल्ली असलेली सुगावा चिठ्ठी सर्व गटांना समान होती. विजेत्या गटाला ज्ञान रुपी खजिना – विविध पुस्तकांचे पारितोषिक व सन्मानचिन्हासहीत प्रमाणपत्र देण्यात आले.
कंरजाडे ते गव्हाण या आरोग्य विभागाचे अधिकारी सचिन सोनावणे हे प्रमुख अतिथी या नात्याने त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विवेकानंद केंद्र, पनवेल यांच्या तर्फे प्रा.सौ. संजीवनी धर्माधिकारी यांनी विवेकानन्द यांच्या जीवनावर व्याख्यान केले. बाळगोकुलंच्या निमंत्रक प्रा.सौ. सरोज गाडगीळ यांनी विविध सोसायटीमध्ये असेच अनोखे खेळ आयोजित करण्याचे आवाहन केले. या आयोजनात एकूण 26 कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.








Be First to Comment