रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलिसांनी केले ज्येष्ठांना मार्गदर्शन तर अंध व्यक्तींच्या संस्थेला मदत
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्याचे वपोनि संजय पाटील यांनी आगळावेगळा उपक्रम राबवून कामोठे वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कोव्हिड संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बदलापूर येथील एका अंध व्यक्तींच्या संस्थेला रोख रक्कमेची मदत केली.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व पोलीस ठाण्यात रायझिंग डे उपक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने कामोठे पोलीस ठाण्याचे वपोनि संजय पाटील व त्यांच्या इतर अधिकारी व कर्मचार्यांनी यावेळी विभागातील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विविध समस्यांसंदर्भात त्यांना मार्गदर्शन केले.
कोरोना संदर्भात मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आदी संदर्भात सुद्धा सुचना केल्या. त्याचप्रमाणे बदलापूर येथील एका अंध व्यक्तींच्या संस्थेला रोख रक्कमेची मदत यावेळी करण्यात आली.
आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सुचनेनुसार त्यांचा यथोचित सत्कार व वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार
वपोनि संजय पाटील








Be First to Comment