पनवेल तालुक्यात पाहायला मिळणार काटे की टक्कर
महाविकास आघाडीला मिळणार मोठे यश : काशीनाथ पाटील
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेला येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पनवेल तालुक्यात कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे.शेकाप प्रणित महा विकास आघाडीकडे 12 तर भाजपकडे 12 ग्रामपंचायती आहेत.तूर्तास दोन ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या असून त्या पैकी आकुर्ली ग्रामपंचायत भाजपच्या कब्जात राहिली असून खानावळे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा लालबावटा फडकला आहे.
महविकास आघाडी आणि भाजपा कडे सध्या समसमान ग्राम पंचायती असल्याने निवडणूक चुरशीची होणार असे संकेत मिळत आहेत.
माहाविकास आघाडी च्या घटक पक्षांपैकी शेतकरी कामगार पक्षाची ताकद पनवेल तालुक्यामध्ये निश्चितच जास्त आहे. त्यांच्या जोडीला काँग्रेस आणि शिवसेना असल्याने निश्चितच ही ताकद वाढेल.ग्रामीण विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे फारसे अस्तित्व नसले तरीसुद्धा त्यांच्या असण्याने बेरजेचे राजकारण होणार आहे. भाजपाच्या वतीने कर्नाळा बँक घोटाळा मुद्दा या निवडणुकांमध्ये ऐरणीवर ठेवण्यात आला आहे. तर या मुद्द्याचा दुर्गम ग्रामीण विभागातील मतदारांवर फारसा परिणाम होणार नाही असे शेकाप चे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांचे म्हणणे आहे.
आम्ही आमच्या ताब्यातील ग्रामपंचायती अबाधित ठेवून भाजपच्या ताब्यातील किमान चार ते पाच ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावू असा मला विश्वास वाटतो.विरोधकांच्या वतीने कर्नाळा बँक घोटाळा चे कितीही राजकारण केले गेले तरीदेखील मतदार हा सुज्ञ असल्यामुळे त्याचा आमच्या मतदानावर फारसा परिणाम होणार नाही.
काशिनाथ पाटील
शेकाप चे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष









Be First to Comment