आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पनवेल महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची थट्टा केली आहे : शिवदास कांबळे
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
महानगर पालिकेच्या वतीने सोमवार दिनांक 11 जानेवारीपासून पनवेल शहरातील पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे महापालिका स्थापनेनंतर चार वर्षांमध्ये पाण्यासारख्या समस्या वरती सत्ताधारी पक्ष कोणताही तोडगा आजपर्यंत काढू शकलेली नाही व व संभाव्य तीव्र पाणीटंचाईची शक्यता महापालिकेने नागरिकांना करून दिलेली आहे विकासाकडे झेपावणाऱ्या पनवेल शहरांमध्ये कोणताही आमूग्राही बदल महापालिका स्थापनेनंतर झालेल्या नाही किमान पाणी मिळावं अशी माफक इच्छा असणाऱ्या पनवेलकर यांचा अपेक्षाभंग झालेला आहे अशी तिव्र प्रतिक्रिया पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकारी जिल्हाध्यक्ष शिवदास कांबळे यांनी व्यक्त केली आहे.








Be First to Comment