सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खारघर परिसरातील शेकडो तरुणांनी तसेच महिलांनी भगवा ध्वज हाती घेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी केले.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे खारघर येथील युवकांचा व महिलांचा शिरीष घरत (शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व नेतृत्वाखाली निझमुद्दीन मलिक, सेफी बबलू, ए शमशाद खान, समीम खान, तसेच युसूफ शेख यांच्या सह शेकडो युवकांचा व महिलांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला.
त्याप्रसंगी पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक गुरूंनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, खारघर शहर प्रमुख शंकरशेठ ठाकुर, ग्राहक कक्ष उपजिल्हा प्रमुख शशिकांत डोंगरे, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, महानगर संघटिका, सौ.शुभांगी शेलार, पनवेल तालुका संघटिका सौ. सुजाता कदम , उपमहानगर संघटिका सौ. रिना पाटील, शिवसेना पदाधिकारी तसेच महिला आघाडी व युवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Be First to Comment