सिटी बेल लाइव्ह । विश्वास निकम । गोवे कोलाड ।
ह.भ.प.देवकी अंकुश घोगरकर यांचे अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान रात्री दहाच्या दरम्यान निधन झाले. त्यांचे दशक्रिया विधी सुकेळी येथील कॅनल शेजारी दि. ११ जानेवारी रोजी तसेच त्यांचे उत्तर कार्य विधि त्यांच्या राहत्या घरी दि १४ जानेवारी रोजी होईल तसेच उत्तर कार्याच्या दिवशी नाना महाराज शिरसे वारकरी सांप्रदाय (अध्यक्ष ऐनघर पंचक्रोशी) यांचे प्रवचन होईल.
ह.भ.प. देवकी घोगरकर यांच्याविषयी सांगायचे झाले तर पस्तीस वर्षे वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी जपलेली आहे त्यांचे पती आणि त्यांचे सर्व कुटुंब त्यांचे आई-वडील यांचासुद्धा वारकरी सांप्रदाय जपण्यात महत्त्वाचा वाटा आहे. सुकेळी आदिवासी वाडी मध्ये दरवर्षी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये त्या हिरीरीने भाग घेत असत.अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या त्या होत्या यामुळे त्यांच्या निधनाने संपूर्ण आदिवासी वाडी, ऐनघर पंचक्रोशी परिसर या विभागावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुली, एक मुलगा,पती ह.भ.प. अंकुश घोगरकर (चोपदार) तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.








Be First to Comment