Press "Enter" to skip to content

पाणी पुरवठ्यामध्ये पनवेल महानगरपालिका करतेय काटकसर

एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद : महानगरपालिकेची पाणी पुरवठा उपाययोजना सुरू

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम ।

गेल्या काही दिवसापासून शहरात होत असलेल्या अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे पनवेल महानगरपालिकेने आता एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद अशी उपाय योजना करून पाणी पुरवठा करण्याचे ठरविले असून त्याची सुरूवात सोमवार दि.11 जानेवारी 2021 पासून शहरातील उंच जलकुंभनिहाय होणार आहे. आठवड्यातील 5 दिवस पनवेल शहरासाठी ही उपाय योजना केली असून शनिवार व रविवारी सर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे.

शहरास होणारा पाणी पुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व देहरंग धरण मिळून एकत्रितपणे मिळून करण्यात येतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या संस्थेस पाताळगंगा नदीतून दर रविवार व सोमवार या दिवशी कमी पाणी मिळते व इतर काळात इलेक्ट्रीक शटडाऊन, ब्रेकडाऊनमुळे दोन्ही संस्थेकडून वारंवार कमी पाणी मिळत असल्याने देहरंग धरणाचे जास्त पाणी घेवून शहराची दररोज गरज भागविण्यात येते. परंतु त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला, ही वस्तुस्थिती विचारात घेता धरणातील शिल्लक असलेला पाणीसाठा माहे 15 जून 2021 पर्यंत पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या दृष्टीने सोमवार दि.11/01/2021 रोजीपासून पनवेल शहरामध्ये उंच जलकुंभ निहाय एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पनवेल महापालिकेमार्फत देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.