Press "Enter" to skip to content

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीदिन साजरा

क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे पनवेल मधील शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार सोहळा दिमाखात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १८९ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

त्यांच्याच पाऊलांवर पाऊल टाकत आज समाजातील प्रत्येक स्त्री समाजात अभिमानाने वावरत आहे,स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून यशाचा डोंगर सर करीत आहे. समाजातील अश्याच सुशिक्षित, कर्तृत्वान, जिज्ञासू, मेहनती शिक्षका यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांसारखे विदयार्थी घडवण्याचे अमूल्य कार्य केले आहे, त्यामुळेच पनवेल मधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या शिक्षकांचा सत्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत आयोजित करण्यात आला होता.

या सत्कार सोहळ्याची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली, त्यानंतर उपस्थित सर्व मा. महिलावर्गाची फॉउंडेशन च्या सदस्यांनी महिलांना हळदीकुंकू लावून ओटी भरली व कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर जाऊन आपले मनोगत व्यक्त केले. क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले,त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच या सोहळ्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी जयंतीनिमित्त दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी 4 वाजता विसपुते महिला वसतिगृह नवीन पनवेल सेक्टर १५, प्लॉट नंबर ४१,पनवेल (पूर्व ) याठिकाणी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे पनवेल मधील शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री विसपुते कॉलेज व आदर्श शैक्षणिक समूह चे चेअरमन धनराजजी विसपूते,उद्योजक मा.श्री सतिशजी मोरे, माजी महापौर मा.सौ. चारुशीला घरत, ऍड सौ.संगीता रोकडे ,ऍड सौ.दीपाली बांद्रे, माजी नगरसेविका सौ.नीता माळी,
मा.श्री कादिरभाई कच्छी, ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्ष आर.डी.घरत, डी डी विसपुते प्राध्यापिका सौ.सीमा कांबळे, प्राध्यापिका श्रीमती इंदुमती ठक्कर, मुख्याध्यापक एम.यु.एम. इंटरनॅशनल स्कुल चंद्रकांत सूर्यवंशी,
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.श्री रत्नाकर पाटील, उद्योग नगरी वृत्तपत्राचे पत्रकार कुमारी रुपाली वाघमारे, दैनिक हिंदू सम्राट वृत्तपेपर चे पत्रकार मा.श्री वीरेंद्र म्हात्रे, जागरूक महाराष्ट्र वृत्तपत्राचे पत्रकार मा.श्री एकनाथ गोपाळ, सौ.मा.जयश्रीमाई सावार्डेकर भारतीय महाक्रांन्ती सेना राष्र्टिय अथ्यक्ष महिला आघाडी, समाजसेविका वंदना बामणे, सह शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते तसेच क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.यावेळी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे, सदस्या सौ.मौसमी तटकरे, विचुंबे विभागीय अध्यक्षा सौ.रत्नमाला पाबरेकर, सदस्या सौ. यामिनी महाजन,सदस्या सौ. माणिनी घोडके व डी.डी.विसपुते कॉलेज चे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.